वडगाव मावळ:
देशाचे गृहमंत्री व केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचा माजी मंत्री बाळा भेगडे व पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष गणेश भेगडे यांनी मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथे भेट घेऊन भक्तीशक्तीचे शिल्प,सांप्रदायिक पगडी,उपरणे देऊन सत्कार केला.
माजी मंत्री बाळा भेगडे यांनी तळेगाव दाभाडे येथील डीआरडीओ मिसाईल प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांच्या विषया संदर्भातील निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.
लवकरच संबंधित मंत्रालयाशी चर्चा करून शेतकऱ्यांना न्याय देऊ असे आश्वासन गृहमंत्री शहा यांनी दिले.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

error: Content is protected !!