कामशेत:
महावीर हॉस्पिटल चे सर्वेसर्वा डॉ.विकेश विकास मुथा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महावीर हॉस्पिटल ने फिरता दवाखाना ही संकल्पना राबवली आहे .आपल्या गावात आपला दवाखाना या थीमवर आधारित असलेल्या या महा आरोग्य यज्ञाचा लोकार्पण सोहळा खासदार श्रीरंग बारणे व कामशेत पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या शुभहस्ते सोमवार तारीख २० ला केला जाणार आहे .
ग्रामीण भागातील रूग्णसेवेची गैरसोय लक्षात घेऊन महावीर हॉस्पिटलने हा उपक्रम सुरू केला आहे .सोमवार ते रविवार अशा आठवड्यातील आठ दिवस हा फिरता दवाखाना अनुक्रमे मावळ तालुक्यातील वाडीवळे ते खांडशी, नाणे ते जांभवली,पाथरगाव ते ताजे बोरज, नानोली ते घोणशेत,कोंडीवडे ते सावळा,वडेश्वर ते निळशी या गावात जाणार आहे.
सकाळी साडेआठ ते चार वाजेपर्यंत या आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांना आपलसा वाटणारा महावीर हॉस्पिटल या दवाखान्यात सर्व आरोग्य सुविधा असणार आहे.
या शिवाय इन्शुरन्स कंपन्यांच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध आहेत. डेडिकेटेड हेल्थ केअर सर्विसेस , डी एच एस पॅरामाउंट फॅमिली हेल्थ प्लॅन, हेरिटेज हेल्थ ,आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स, एचडीएफसी जनरल इन्शुरन्स, टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स, लिबर्टी जनरल इन्शुरन्स ,बजाज आलियांज, रेलिंग इयर ,मॅक्स बुपा इन्शुरन्स ,आय सी आय सी आय बँक अशा नामांकित कंपन्यांच्या इन्शुरन्स वर कॅशलेस सुविधा उपलब्ध आहे. हेल्थ इंडिया ,अपोलो , स्टार हेल्थ , न्यू इंडिया इन्शुरन्स, ओरिएंटल इन्शुरन्स, युनायटेड इंडिया ,रॉयल सुंदरम, चोलामंडलम ,युनिव्हर्सल,एसबीआय जनरल इन्शुरन्स या कंपन्यांच्या एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ,एग्रीकल्चर इन्शुरन्स ,श्रीराम जनरल इन्शुरन्स, एलआयसी हेल्थ लिमिटेड या कंपन्यांचे सुविधा विमा कवच रुग्णांना मिळणार आहे.
विशेष ओपीडी, ऑपरेशन थेटर ,अर्थस्कॉपे अॅण्ड जॉइंट रिप्लेसमेंट, विरोलॉजी अ‍ॅण्ड लेप्रोजी ,24 तास ॲम्बुलन्स ,सर्जरी ,नाक कान घसा तपासणी व उपचार,आय सी यु पेन क्लीनिक, 24 तास फार्मसी, 24तास रक्ततपासणी, एक्स-रे तपासणी आणि मोबाइल क्लिनिक या सर्व सुविधा महावीर ने रुग्णांसाठी खुल्या केल्या आहेत. ज्याचा लाभ रुग्णांना घेता येणार आहे.

error: Content is protected !!