निगडे:
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत नवलाखउंब्रे येथे केंद्र पातळीवर विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यावेळी झालेल्या लहान गटातील निबंध स्पर्धेत निगडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सार्थक योगेश भांगरे इयत्ता ४थी प्रथम , यशांजली लक्ष्मण भागवत इयत्ता ४थी तृतीय क्रमांक .सामान्य ज्ञानस्पर्धा सार्थक योगेश भांगरे इयत्ता ४थी प्रथम क्रमांक यांनी मिळवला.
मोठा गट सामान्य ज्ञान स्पर्धा श्रेयस साहेबराव भांगरे इयत्ता ७वी प्रथम क्रमांक. प्रश्नमंजुषा स्पर्धा आदित्य संदीप चव्हाण इयत्ता ७वी प्रथम क्रमांक ,सलोनी दशरथ गवारी इयत्ता ६वी निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला .
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना केंद्राचे केंद्रप्रमुख खुरसले सरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.


सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका मंगल मस्तुद वर्ग शिक्षिका, सौ भगत मॅडम ,श्रीमती मुंडे मॅडम ,वर्गशिक्षक आदिनाथ शिंदे सर यांचे मार्गदर्शन लाभले .सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे निगडे सरपंच ,उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य ,शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून पुढे होणार्‍या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
निगडे गावच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सविता भांगरे यांनी मुलांचे कौतुक व अभिनंदन करून आपल्या शाळेचे व गावाचे नावलौकिक करून अशीच उंच भरारी घ्यावी अशी सदिच्छा व्यक्त केली.

error: Content is protected !!