वडेश्वर :
येथील महिला संस्कृतीक भवन येथे महिलांसाठी खादी ग्रामोद्योग आयोग, भारत सरकार मार्फत मधमाशी पालन जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अशोक सिंघल मेमोरियल ट्रस्ट व सेवावर्धिनी संचालित ग्रामदूत प्रकल्पाच्या सहयोगाने हा उपक्रम घेण्यात आला.
वडेश्वर, कुसवली, शिंदेवाडी, नागथली, डोंगरवाडी, सटवाईवाडी, मोरमारवाडी, वाहनगाव येथील महिलांसाठी आयोजित करण्यात आला होता.सदर प्रशिक्षनासाठी एकुण 113 महिला उपस्थित होत्या.प्रशिक्षणाची सुरवात भारत मातेच्या प्रतिमा पूजनाने झाली व नारीशक्ती ग्रामसंघ वडेश्वर तेथील महिलांनी सुंदर गीत गाऊन झाली.
प्रशिक्षण देण्यासाठी CBRTI मार्फत श्री सुधीरजी पोकरे (सहसंचालक ) जहे आले होते त्यांनी खालील विषयावर मार्गदर्शन सखोल केले.


•मधमाशी पालन व्यवसाय म्हणजे काय?
• मधमाशी पालन कशासाठी?
•मधमाशी पालन कोण करू शकतो?
• मधमाशी पालन व्यवसायाचा कालावधी
• मधमाशा पाळन्यास यौग्य क्षेत्र.
•मधमाशी पालनाचे स्वरूप
• मधमाशी पालनाला सुरवात कशी करावी.
• मधमाशी पालन एक चित्तकार्शक व किफायतशीर धंदा.
•मधमाशा व शेती एक अतूट संबंध.
•पराग सिंचन म्हणजे काय?
• मधमाशा पालन उत्पादने. (मध, मेण, मधमाशाचे विष, पराग, रायल जेली).
• मध शुद्ध करण्याचे उपाय.
• मध पॅकिंग पद्धती.
• मधाचे मार्केट व उत्पादन.
वरील मुद्यावर प्रशिक्षनार्थीना मार्गदर्शन करण्यात आले व सर्व महिलांचा उत्कृष्ट सहभाग मिळाला.


व सर्वांनाच हे प्रशिक्षण आवडले व अनेक महिलांनी पुढील पाच दिवसाचे प्रशिक्षण घेण्याची तयारी दर्शवली आहे. प्रमोद कुलकर्णी यांनी मधमाशी पालन त्याचे फायदे आणि त्यातून होनारी आर्थिक उन्नती यावर मार्गदर्शन केले व पुढील प्रशिक्षनासाठी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री हर्षण पाटील यांनी केले तर वडेश्वर ग्रामपंचायत च्या सरपंच सौ. छाया हेमाडे व कुसवली ग्रामपंचायत च्या सरपंच सौ. चंद्रभागा दाते यांनी संस्थेचे, शासनाचे व प्रशिक्षनार्थी यांचे आभार मानले, सदर कार्यक्रमाचे नियोजन ग्रामपंचायत चे उपसरपंच श्री ज्ञानेश्वर जगताप (माऊली), सदस्य कु. रुपाली सुपे,संतोषी खांडभोर , शुभांगी दरेकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य,रवी हेमाडे, कु. सुनीता शिंदे (अंगणवाडी सेविका) यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माणिक गवळी यांनी केले व हेमंत पतंगे यांनी तांत्रिक सहाय्य केले.

error: Content is protected !!