करंजगाव :
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्ताने संपूर्ण तालुक्यामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.खडकाळे येथे पार पडलेल्या स्पर्धांमध्ये करंजगाव शाळेतील इयत्ता चौथी ची विद्यार्थीनी सिद्धी मुकुंदा भालशिंगे या विद्यार्थिनीचा प्रश्न मंजूषा या स्पर्धेत बीटस्तरावर प्रथम क्रमांक आला आहे. त्याच प्रमाणे इयत्ता सातवीची विद्यार्थीनी श्रृती संतोष पवार या विद्यार्थिनीचा वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक आला आहे. दोन्ही विद्यार्थींनीचे कौतुक होत आहे.
या दोघींचा सत्कार करण्यात आला. यावेळी विस्तारधिकारी कृष्णा भांगरे, सुहास धस, अजित मोरे यांच्यासह अन्य शिक्षक व अधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!