वडगाव मावळ:
हँड इन हँड इंडिया संस्थेमार्फत राबविल्या जाणाऱ्या ग्राम उद्धार कार्यक्रमाअंतर्गत डाहुली, कशाळ, भोईरे, ताजे, कुसवली व देवले तील महिलांना उद्योजकता विकासासाठी मदत व प्रोत्साहन म्हणून कोंबड्यांचे वाटप करण्यात आले.
ग्रामीण भागातील महिलांनी मिळालेल्या कोंबड्यांपासून अंडी उत्पादन व्यवसाय सुरु करण्यासाठी संस्थेने वरील गावांमध्ये २४६ विविध कुटुंबातील महिलांना एकूण २४६० देशी कोंबड्या वाटप केल्या आहेत. महिलांनी स्वतः चा कुक्कुटपालन व्यवसाय वाढवून आर्थिक उन्नती साधावी या उद्देशाने हे कोंबड्या वाटप करण्यात आले आहे.
भविष्यातही संस्थेकडून याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याने महिला व ग्रामस्थांनी या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.

error: Content is protected !!