टाकवे बुद्रुक:
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाअंतर्गत शासकीय निर्णयानुसार कोरोनाविषयक नियमांचे पालन करुन खांडी केंद्रातील विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा दुर्गम भागातील खांडी येथील शाळेत संपन्न झाल्या.पहिली ते चौथी यांचा लहान गट व पाचवी ते सातवी यांचा मोठा गट अशी विभागणी करुन दोन गटात या स्पर्धा घेण्यात आल्या.
यावेळी झालेल्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी खांडी केंद्राचे केंद्रप्रमूख गंगाराम केदार,खांडी शाळेचे मुख्याध्यापक सुनिल साबळे,डाहूली शाळेचे मुख्याध्यापक यशवंत पवार,शिक्षक पतसंस्थेचे तज्ञ संचालक खंडू शिंदे,बोरवली शाळेचे मुख्याध्यापक विनायक पारखे तसेच केंद्रातील शिक्षक वर्ग इ.उपस्थित होते.


विविध स्पर्धांच्या माध्यमातून चुरस निर्माण होते तसेच त्यातून नेतृत्वगुण विकसित होऊन विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव दिला जातो असे मत केंद्रप्रमूख गंगाराम केदार यांनी व्यक्त केले.यावेळी झालेल्या निबंध स्पर्धेचे पर्यवेक्षण राजू वाडेकर व उमेश माळी यांनी तर सामान्यज्ञान स्पर्धेचे नियोजन दत्तात्रय डावखर व रामेश्वर बागडे यांनी केले.लहान व मोठ्या गटातील वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण सुजाता भोसले,संगिता दाते व दिपाली पारखे यांनी केले.
प्रश्नमंजुषा स्पर्धा सुशील कांबळे व दीपाली निमकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.संपूर्ण स्पर्धेचे संयोजन खांडी शाळेतील शिक्षक शिवाजी चौगुले,राहूल राठोड व रुपाली गायकवाड यांनी केले.बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उमेश माळी यांनी तर आभार सुवर्णा वाडिले यांनी मानले.केंद्रस्तरावरील या स्पर्धेत यश मिळवलेले विद्यार्थी हे कामशेत येथील बीटस्तरावरील स्पर्धेसाठी पात्र ठरले असून त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतूक होत आहे.

error: Content is protected !!