मुंबई:
नविन वर्षात मुंबईचा वेग वाढणार आहे. मेट्रो २ अ व मेट्रो ७ प्रकल्प जवळ जवळ पुर्ण झाले आहेत. २०२६ पर्यंत मुंबईतील सर्व मेट्रो मार्ग काम पुर्ण करण्याचे नियोजन आहे. मुंबई महानगर परिसरात वर्तुळाकार मेट्रो मार्ग तयार होतील २०३१ पर्यंत एक कोटी प्रवासी मेट्रोने प्रवास करतील असा अंदाज आहे.
मुंबईत पहीली मेट्रो वर्सोवा-घाटकोपर चालू झाली व काही वर्षाच मुंबईत अनेक मेट्रो धावू लागतील. या मेट्रोचा एक तोटा नक्कीच आहे तो म्हणजे या मेट्रोला लगेज डबाच नाही. त्या मुळे आमच्या सारखे प्रवासी आपल्या सोबत लगेज घेऊन जावू शकत नाही. ठरावीक लांबी,रूंदी, व वजनाचे सामान मेट्रो मधुन नेण्यासाठी परवानगी आहे.


तात्पर्य काय तर मेट्रो मधुन थोडे मोठे सामान नेऊ शकत नाही. या नियमा मुळे डबेवाला मेट्रोने जेवणाचे डबे घेऊन प्रवास करू शकत नाही.आमचा साहेब मेट्रोने आपल्या कार्यालयात कामावर जावू शकतो पण त्यांच मेट्रोने आम्ही त्या साहेबांचा डबा त्याच्या कार्यालयात पोहचू शकत नाही ही समस्या आहे.
मुंबईच्या लोकल रेल्वेची निर्मीती केली तेव्हा मुंबईतील कष्टकरी,छोटे छोटे व्यवसायीक, कामगार या वर्गाचा विचार करून लोकल रेल्वेला लगेज डबे जोडण्यात आले त्या मुळे या वर्गाची सोय झाली. पण मेट्रो निर्मातीचा विचार करताना या वर्गाचा काहीही विचार केला गेला नाही याची खंत आहे.
विदेशातील मेट्रोचा अभ्यास केला आणी त्याच धर्तीवर मुंबईत मेट्रो साकारली जाते आहे. ती साकारत असताना मुंबईतील कष्टकरी, छोटे छोटे व्यवसायीक, कामगार यांचा विचार केला नाही ? जर यांचा विचार केला असता तर मेट्रोला एक लगेज डबा नक्कीच जोडला आसता.
पहीली मेट्रो चालू झाली तेव्हा ही समस्या आम्ही तात्कालीन MMRDA चे आयुक्त मदान साहेब यांच्या लक्षात आणुन दिली. तेव्हा त्यांच्या कार्यालयाच्या वतिने सांगितले सुचना चांगली आहे. पण सध्याच्या मेट्रोला लगेज डबा लावायची सोय नाही. पण मागे पुढे जर मेट्रोच डबे वाढले तर या सुचनेचा निश्चित विचार करता येईल.


सध्या मेट्रो व मोनो रेल्वेची कामे जोरात चालू आहेत काही वर्षाने या सर्व मेट्रो धावू लागतील. आमची मेट्रो प्रशासनाला व सरकारला विनंती आहे की मेट्रो आणी मोनो रेल्वेला लगेज डबा लावला जावा.
मुंबई डबेवाला असोशिएशन अध्यक्ष सुभाष तळेकर म्हणाले,” मुंबई फक्त कार्पोर्रेट क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची नाही तर अंग मेहनत व कष्ट करणाऱ्या कामगारांची सुध्दा आहे. या कष्टकरी कामगारांकडे थोडेतरी सामान असते. त्या मुळे हा वर्ग मॅट्रो व मोनो रेल्वेने प्रवास करू शकत नाही. तसं पाहील तर मुंबईच्या विकासात या कष्टकरी,श्रमकरी कामगारांचे मोठे योगदान आहे हे योगदान लक्षात घेतां मुंबईच्या या कष्टकरी, कामगार जनतेला आपले सामान आपल्या सोबत नेता यावे म्हणुन मेट्रो न मोनो रेल्वे ला एक लगेज डबा लावण्यात यावा.

error: Content is protected !!