मावळमित्र न्यूज विशेष:
लोकनेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब…आमचे श्रद्धास्थान..जिथे दोन्ही कर जोडून दंडवत घालावे … त्यांच्या चरणांवर निष्ठा वाहावी… असे एकमेव नेते.. आदरणीय साहेब…. ज्यांना पाहत आणि वाचत आमची पिढी मोटिव्हेशन होते….असा प्रेरणेचा ओतप्रोत झरा म्हणजे साहेब….
१२ डिसेंबर १९४० साहेबांचा जन्मदिवस…५० वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी राजकारणाला दिली…. ४ वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री…, देशाचे संरक्षण मंत्री… केंद्रीय कृषिमंत्री असा प्रवास त्यांच्यातील मोठेपणच सिद्ध करणारा ठरतो.साहेबांची ताकद कधीही आकड्यांवरून मोजली जात नाही आणि ती मोजली ही जाऊ नये. शून्य हा असा आकडा ज्याच्या मागे लिहिला जातो त्याची किंतम शतपटीने वाढते. इतरांच्या किमती शतपटीने वाढणारे साहेब महाराष्ट्राच्या मनामनात कोंदण करून राहिले आहे.


आदरणीय साहेबांचे,दिल्लीच्या राजकारणातील महत्त्व थोडंही कमी झालं नाही, उलट दिवसेंदिवस राजकीय महत्त्व आणि पावर वाढतच गेली आणि ते इतके वाढले की,’पवार इच पाॅवर’ ही टॅगलाईन रूढ झाली.
राजकारणातील मुरब्बी’ म्हणून आदरणीय शरद पवार साहंबांची ओळख पूर्वीपासून आहे. १९७८मधील पुलोद सरकार बनवतानाच्या घटना असोत, की २०१९मध्ये शिवसेनेला महायुतीतून बाहेर घेऊन, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करणे असो, शरद पवारांनी आत्तापर्यंत तेच केलं जे इतरांना कधीही जमणार नाही.आणि जमलेही नाही. ज्या वयात आराम करायचा, घरात बसायचे, त्या वयात पवार साहेब महाराष्ट्रभर फिरत आहेत. सगळ्या आव्हानांना उत्साहाने सामोरे गेलेले साहेब आपण पाहतो आहोत.
लातूरचा भूकंप असेल, महिलांना दिलेलं आरक्षण असुद्या, देशाच्या इतिहासातील पहिली शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी असुद्या, शरद पवारांनी नेहमीच जनतेमध्ये मिसळून लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा प्रश्न असो वा कष्टकऱ्यांचा, फळबागांचा असो वा साखर कारखान्याचा, क्रिकेटचा प्रश्न असो वा कुस्तीचा प्रत्येक प्रश्न साहेबांनी मार्गी लावला.


राजकारणा व्यतिरीक्त क्रिकेट क्षेत्र हेही साहेबांचे विश्व. क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदावर पवार साहेब २९ नोव्हेंबर २००५ साली निवडुन आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची सुत्र १ जुलै २०१० ला पवार साहेबांनी स्विकारली. हे पद भुषवणारे ते दुसरे भारतीय ठरले त्यांच्या पुर्वी जगमोहन दालमियांनी हे पद भुषवले होते.
राज्यात 2२०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या कालावधीत राष्ट्रवादी कॉंग्रेस हा सत्तेच्या परीघाबाहेरच होता. त्यावेळी विरोधकांनी राष्ट्रवादीच्या बिनीच्या शिलेदारांना दबावतंत्राचा वापर करीत आपल्या पक्षात ओढले. शिलेदार, कार्यकर्ते नाईलाजास्तव विरोधी गटात सामील होऊ लागले. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत उमेदवारी घेण्यासाठी ज्येष्ठ, अनुभव उमेदवारीची उणीव भासू लागली. त्यावेळी तरूणांना संधी मिळाली. त्याचवेळी साहेब हे राष्ट्रवादी पक्षांसाठी संकटमोचक म्हणून धावून आले. यात निवडणूक प्रचारात त्यांची वरूणराजाशी झालेली भेट ही संपूर्ण महाराष्ट्राला भावली.


८० वर्षांचा योद्धा विरोधकांशी प्रखर लढा देत आहे, याची जाणीव संपूर्ण महाराष्ट्रातील सूज्ञ नागरिकांना झाली. त्यानंतर भरपावसातील प्रचारसभा ही राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरली. महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून श्रेय हे पवार साहेब यांच्याकडे जाते.
आतापर्यंतच्या राजकीय वाटचालीत राज्यावर कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली तर आजही साहेब हे धावून जातात. सर्वसामान्यांचे प्रश्‍न समजावून घेतात. करोना, अवकाळी पाऊस, अतिवृष्टीतील शेतकऱ्यांशी संवाद साधून प्रशासकीय पातळीवर त्यावर उपाययोजना करण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाची शिदोरी युवा पदाधिकारी, मंत्री मनोदय यांना पूरक ठरत आहे. आदरणीय साहेबांचं अष्टपैलू, सामर्थ्यवान, सर्वसमावेशक, युवकांचे प्रेरणादायी नेतृत्व महाराष्ट्रसाठी रोल मॉडेल आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना पुरोगामी महाराष्ट्रातील सर्वसामान्यांपासून कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांकडून मंगलमय शुभेच्छा…
(शब्दांकन- विक्रम कदम, चिटणीस ,प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस)

error: Content is protected !!