वडगाव मावळ:
फळणे येथील मंडप व्यावसायिक तरूणाचा पिंपळोलीत महावितरणच्या विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.ज्ञानदेव कंकाराम मालपोटे असे या तरुणाचे नाव आहे. शुक्रवार ता.३ला पिंपळोली येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व श्री वाघेश्वर देवाचा उत्सव होता. या निमित्त आंदर मावळातील पवळेवाडी येथील श्रीराम कलापथक मंडळाचा भजनी भारूडाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात मंडप स्पीकरची व्यवस्था मालपोटे यांच्या कडे होती. मंडप स्पीकर साठी वीजेची आवश्यकता होती. वीज जोडणी करताना वीजेचा धक्का बसला,उपचारासाठी दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला.ज्ञानदेवच्या जाण्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

error: Content is protected !!