वडगाव मावळ :
अवकाळी पावसामुळे राज्यातील विविध भागात शेतीचे खूप नुकसान झाले आहे. मावळसह जिल्ह्यात पशुधन मोठ्या प्रमाणात दगावल्याच्या घटना घडल्या असून,पुढील दोन तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तविला असल्याने शेतकरी बंधूंनी पशुधन दगवणार नाही ही काळजी घ्यावी.आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा विश्वास पार्थ अजित पवार यांनी बळीराजाला दिला.
मागील दोन दिवसांपासून पाऊस कोसळतोय, थंडीत कमाली गारठा आहे, धुक्याची चादर पसरली आहे. परिणामी पशुधन दगावत आहे. मावळ तालुक्यातील पोटा पाण्यासाठी आलेल्या धनगर बांधवांच्या शेळया मेंढ्या दगावल्या आहे. शेतीचे नुकसान होत आहे आरोग्यावर याचा परिणाम नाकारता येत नाही.
राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी सोशल मीडियावरून बळीराजाला साद देत, काळजी घ्या आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा विश्वास दिला आहे.

error: Content is protected !!