कामशेत:
ग्रामसंघाच्या अध्यक्षपदी शुभांगी मारूती म्हस्के यांची निवड झाली. मावळ तालुक्यातील बौर ब्राह्मणवाडी येथे प्रथमच महिला ग्रामसंघ स्थापन करण्यात आला. त्यामध्ये अध्यक्षासाठी दोन अर्ज आल्याने महिलांमध्ये निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये शुभांगी मारुती म्हस्के यांना बहुमत सिद्ध झाल्याने अध्यक्ष म्हणून नाव घोषित करण्यात आले.
रेश्मा नवनाथ ठोंबरे यांना सचिव आणि अर्चना सुरेश खिरीड यांना कोषाध्यक्ष म्हणून नेमण्यात आले.

त्यावेळी पंचायत समितीचे सुभाष गायकवाड मोहिनी लाठे , लक्ष्मण सर, सरपंच संदीप खिरीड, ग्रामपंचायत कामगार संघटनेचे अध्यक्ष गणेश वाळुंजकर, सीआरपी अनिता वायभट, २६ महिला बचत गटाच्या सर्व महिला उपस्थित होत्या.
नवनिर्वाचित अध्यक्षा शुभांगी म्हस्के म्हणाल्या,” गावांमधील असणारे सर्व महिला बचत गटांना कर्ज उपलब्ध करून विविध प्रकारचे योजना राबविण्यात येईल .महिला सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न करील.

error: Content is protected !!