वडगाव मावळ:
जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज,ज्ञानेश्वर माऊली या थोर संतानी जगाला मोठा संदेश दिला आहे प्रतेकाने या विचाराचे आचरण केले पाहिजे असे मत राजस्थान वारकरी संप्रदायाचे प्रदेशाध्यक्ष श्रीमंत रमेशसिंह व्यास यांनी व्यक्त केले. गोरगरीब जनतेची निस्वार्थी सेवा हिच संताची शिकवण आहे समाजात जनजागृती करण्याचे अवाहन केले आहे साईबाबा सेवाधाम कान्हे येथे मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने सभासद मार्गदर्शन मेळावा व नियुक्तीपत्र प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळ गेल्या ३ वर्षांपासून मावळ तालुक्यात सांप्रदायिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे.
मंडळाने काही क्रियाशील सदस्यांच्या माध्यमातून गेल्या १ महिन्यापासून नवीन सभासद अभियान संपूर्ण मावळ तालुक्यात रावबिले होते . गाव तिथे सभासद अशा संकल्पनेतून प्रत्येक गावात ग्रामप्रतिनिधीची निवड केली मंडळाच्या माध्यमातून धर्म जोपासना व सभासदांकडून सामाजिक व अध्यात्मिक कार्य घडावे या हेतूने सदर मेळाव्याचे आयेजन केले होते.
माजी आमदार दिगंबरदादा भेगडे शंकरराव शेलार, ज्ञानेश्वर महाराज ठाकर ( मुकूंदनाना राऊत ( अध्यक्ष घोरावडेश्वर प्रासादिक दिंडी ) सुकनजी वाफना ( अध्यक्ष देवराई संस्था ) रघुनाथ लोहर ( अध्यक्ष वन मावळ दिंडी समाज ) ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली शिंदे ( अध्यक्ष पंढरपुर बांधकाम समिती मावळ ) संतोष कुंभार ( अध्यक्ष कुंभार समाज पुणे ) ह.भ.प. तुकाराम गाडे सेक्रेटरी ( मा.ता. दिंडी समाज ) ह.भ.प.मधुकर महाराज गराडे ( जेष्ठ किर्तनकार ) यांच्या प्रमुख उपस्थितीत मा सुनिल घनवट ( संघटक महाराष्ट्र छत्तीसगड हिंदु जनजागृती समिती ) ह.भ.प. श्रीमंत रमेशसिंह व्यास ( प्रदेशाध्यक्ष वारकरी सांप्रदाय राजस्थान ) व भास्कर खैरे यांचे संघटनात्मक अध्यात्मिक कार्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले . सदर मेळाव्यामध्ये मान्यवरांच्या हस्ते विभागीय अध्यक्ष विभाग प्रमुख ग्रामप्रतिनिधी म्हणून ३५० सभासदांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले .
स्वागत सचिव रामदास गणपत पडवळ यांनी केले . मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प.नंदकुमार शिवराम भसे यांनी प्रास्ताविक केले व मंडळाच्या कार्याची माहिती दिली . सूत्रसंचालन मंडळाचे उपाध्यक्ष ह.भ.प. दिलीप वावरे यांनी केले . उपस्थितीतांचे आभार बजरंग घारे यांनी मानले .
या कार्यक्रमाचे नियोजन दिपक बारिंगे , देवराम सातकर , शांताराम लोहर , ( विभागीय अध्यक्ष ) तसेच ह.भ.प. शांताराम गायखे , नितीन आडिवळे , शिवाजी अण्णा पवार , सुनिल बरघडे , वळवंत येवले , भरत येवले , सुभाष महाराज पडवळ , लक्ष्मण ठाकर सागर शेटे , नाथा महाराज शेलार , पंढरीनाथ शेटे आदींनी केले .

error: Content is protected !!