वडगाव मावळ:
महाराष्ट्र राज्यभर एसटी कामगारांचा विलगीकरण्यासाठी सुरु असलेला संप या संपाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रराज्य भर दिसून येत आहे .परिणामी ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांसह नागरिकांचे अतोनात हाल होताना दिसून येत आहे.
तसेच शहरी भागांमध्ये खासगी बस मधून वाहतूक सुरू आहे परंतु ग्रामीण भागांमधून या सुविधा नसल्यामुळे शाळेतील सावित्रीच्या लेकी, तसेच विद्यार्थी, कॉलेज व औद्योगिक वसाहत मध्ये कामानिमित्त कामाला येणारे कामगार, तसेच काही कामानिमित्त ग्रामीण भागांमधून शहरी भागांमध्ये गेलेले नागरिक पुन्हा माघारी येण्यासाठी त्यांना सुविधा नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
परिणामी एसटी कामगारांचा संप सुरू असल्याकारणाने अनेक नागरिकांची कामे खोळंबली आहेत. प्रामुख्याने यामध्ये शहरी भागासह ग्रामीण भागावरती संपाचा आर्थिक परिणाम होताना दिसून येत आहे.
काही दिवसांपासून एसटी कामगारांचा विलगीकरणासाठी सुरू झालेला संप या संपामुळे आम्हाला शाळेत येण्या – जाण्यासाठी खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने मुलांना लवकर लिफ़्ट मिळते.
परंतु मुलीना अनोळखी गाडीवरती बसणे शक्य होत नाही खाजगी वाहनांची वाट पाहावी लागते त्यानंतर शाळेमध्ये पोहोचता येते. संपाचा तिढा जेव्हा सुटेल तेव्हा सुटेल परंतु तरी या समस्येची दखल घेऊन स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन शाळेच्या वेळेमध्ये खाजगी बस सुविधा सुरू करावी असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

error: Content is protected !!