कामशेत : कामशेत गावच्या हद्दीतील मुंबई पुणे महामार्गावरील कामशेत खिंडीत जेसीबी घेऊन जाणारा ट्रेलर उलटून अपघात झाला आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या प्रकरणी ट्रेलर चालक आझाद पकडूनटअली(वय २५,रा.उत्तरप्रदेश)याने कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मंगळवारी(दि.२३) पहाटे दोन वाजल्याच्या सुमारास कामशेत गावच्या हद्दीतील मुंबई पुणे महामार्गावरील असणाऱ्या खिंडीत चाकण येथुन जेसीबी मुंबईकडे निघालेल्या ट्रेलर चे (एम.एच ४६,बी एम ९०८१) स्टेरिंग अचानक लॉक झाल्याने अपघात झाला व ट्रेलर वरील जेसीबी खिंडीत झाली पडला आहे. या भीषण अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे..

error: Content is protected !!