आमदार सुनिल शेळके व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम

कांब्रे (नाणे मावळ):
मावळचे आमदार सुनील शेळके व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा पर्व फाउंडेशन मावळ व कैलास गायकवाड मित्रपरिवार च्या वतीने होम मिनिस्टर अर्थात खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दिनांक २४ नोव्हेंबर रोजी चार वाजता नाणे ता.मावळ येथे हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमास महिला भगिनींनी उपस्थित राहावे असे आव्हान युवा पर्व फाऊंडेशनचे संस्थापक कैलास गायकवाड व माजी सरपंच तृप्ती गायकवाड यांनी केले .

विजेत्या स्पर्धकास बक्षीस वाटप केले जाणार आहे.
सर्व सहभागी स्पर्धक आकर्षक भेट वस्तू दिली जाणार आहे. सारिका सुनील शेळके ,सिने-नाट्य अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ,मोनालीसा बागल या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे. मावळ राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष कैलास गायकवाड,माजी सरपंच तृप्ती गायकवाड यांनी कार्यक्रमाचं आयोजन केले आहे .
या कार्यक्रमात लकी ड्रॉ काढण्यात येणार असून भाग्यशाली महिलेस टीव्ही, फ्रिज ,वॉशिंग मशीन, कुकर, वॉटर फिल्टर, मिक्सर, कुकर ,रोटी मेकर, इस्त्री दुचाकी अशी बक्षिसे दिली जाणार आहेत.
प्रथम क्रमांक सोन्याचा नेकलेस मानाची पैठणी , द्वितीय क्रमांक सोन्याची नथ पैठणी ,तृतीय चांदीचा छल्ला पैठणी अशा बक्षिसांची ही धमाल आहे .सहभागी स्पर्धकाने कुपन घेऊन यावे असे आव्हान संयोजकांच्या वतीने करण्यात आला आहे.

error: Content is protected !!