मावळमित्र न्यूज विशेष:
उपजत समाजसेवेचे बाळकडू…अंतःकरणात जितकी संवेदनशीलता… तितकीच तळमळ.. याच तळमळीत घडलेला हा तरूण जनसेवेत इतका रमला की,कोणत्याही पदाची बिरुदावली या तरूणाच्या नावा पुढे लावण्या पेक्षा ‘जनसेवक ” ही बिरुदावली शोभू लागली. त्या पाठोपाठ किंगमेकर या शब्दाचे वजन अन महत्व दमदार ठरेल.
तळेगाव करांच्या गळ्यातील ताईत मावळ करांच्या मनातील आदराचे नाव म्हणजे जनसेवा समिती समितीचे अध्यक्ष किशोरभाऊ आवारे. या नेतृत्वाचे काम समाजाभिमुख काम लगेच नजरेत भरते. जनसेवेची कास धरीत,लोककल्याणाचा मंत्र जपणारा हा तरूण नेता कुशल संघटक आहे, कायम जनसेवेचा ध्यास आसणारा नेता- किशोर भाऊ आवारे.
कोरोनाचे निर्बंध शिथिल होतात ना होतात तोच दुकानांच्या बाहेर जमलेली गर्दी भाऊंच्या लक्षात आली. अशी गर्दी जर जमायला लागली तर संसर्ग झपाट्याने होऊ शकतो. त्यासाठी त्यांनी एक योजना आखली. दोन-दोन फुटांवर खडूचे रिंगण आखले. ही रिंगण आखायची योजना सर्वप्रथम भाऊंच्या कल्पनेतून आली हा तळेगाव पॅटर्न देशभर स्वीकारला.
जनकल्याणाचा वसा स्वीकारलेले भाऊ राजकारणातील किंग मेकर ठरले .पारंपारिक राजकारणाला छेद देत विकासभिभुख राजकारण हे त्यांच्या राजकारणातील महत्वाचे पैलू ठरले. सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांनी या कार्यकर्त्यांना बळ दिले.
दगडालाही शेंदूर लावला की त्याला देवपण येतं हा सिद्धांत त्यांनी खरा करून दाखवला.
अडीअडचणीत मदतीला धावून जाण्याचा त्यांचा पिंड आहे. त्यामुळे कित्येकांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. अशा अडचणीत ज्यांच्या पाठीशी भाऊ उभे राहिले असे कित्येक जण समाजात ताठ मानेने वावरताना पाहताना खूपच आनंद होतो.अनेक कार्यकर्ते आणि नेते त्यांच्या पाठीशी भाऊ खंबीरपणे उभे राहिलेल्याने अनेकांचा राजकीय प्रवास हा सुखकर झाला. राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्यांच्या प्रश्नावर त्यांनी नेहमीच बोट ठेवलं .
सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा म्हणून ते लढले झटले आणि त्यात त्यांना यश देखील आले .प्रश्न टोलमाफीचा असो ,दिव्यांगाच्या पेन्शनचा असो, कामगारांच्या रोजीरोटीचा असो,मंडईत भाजीपाला विकणाऱ्या विक्रेत्यांचा असो ,सर्वसामान्य ग्राहकांचा असो त्यांच्या पाठीशी बघून ची ताकद सदैव राहिली. कोरोना महामारी च्या संकटात भाऊंनी केलेल्या कामाचा कौतुक करावं तेवढं कमीच आहे. जनसेवा थाळी सुरू करून भुकेल्या माणसाच्या पोटात दोन घास जातील याकडे त्यांनी कटाक्षानं लक्ष दिलं. दोन वर्षाच्या कर्माच्या संकटात तळेगाव शहरातील एकही माणूस उपाशी पोटी झोपू नये यासाठीची त्यांची तळमळ वाखाणण्यासारखी होती. आदरणीय किशोर भाऊ यांच्या बाबतीत कितीही बोललं कितीही लिहले तरी ते मारुतीच्या शेपटी सारखं न थांबणार आहे .
आजचा दिवस त्यांच्या वाढदिवसाचा त्यांच्या जीवाभावाच्या मित्रांकडून सहकार्य कडून वडिलांकडून आणि कुटुंबीयांकडून लाख लाख शुभेच्छा त्यांना मिळाल्या असतील त्यांचा नातेवाईक म्हणून आपणही भाऊंना शुभेच्छा द्याव्यात म्हणून हा सारा लेखन प्रपंच. त्यांचा नातेवाईक म्हणून आम्हाला सार्थ अभिमान आहे. भाऊ वाढदिवसानिमित्त आरोग्य दीर्घायुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा.
(शब्दांकन: खंडुजी ज्ञानेश्वर कालेकर,लोकनियुक्त सरपंच
काले- पवनानगर)

error: Content is protected !!