वडगाव मावळ:
पवना व आंद्रा धरण प्रकल्पबाधित असलेल्या शिरे-शेटेवाडीतील प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्या बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकारातून बैठक घेण्यात आली.
या बैठकीमध्ये शिरे-शेटेवाडी गावठाण पुनर्वसन भूखंड वाटप संबंधितांना सोबत घेऊन प्रत्यक्षात होणार आहे. प्रकल्पबाधितांनी केलेल्या मागणीनुसार २००५ च्या रेडीरेकनरप्रमाणे कब्जे हक्क व इतर प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्षात कार्यवाही करण्यात येणार आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसोबत समन्वय ठेवून सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागणार असुन ही शेतकऱ्यांसाठी आनंददायी बाब आहे.


तसेच पवना प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात येणाऱ्या क्षेत्राबाबत प्रत्यक्ष वाटपाचे क्षेत्र निश्चित करणे, तसेच किती क्षेत्र उपलब्ध होईल याबाबतचा अहवाल सादर करण्यासाठी मागील बैठकीत निर्देश देण्यात आले होते.त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.पुन्हा सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, तहसीलदार मधुसूदन बर्गे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी रोहिणी आखाडे, ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष दिपक हुलावळे, उपअधीक्षक भूमी अभिलेख ऊर्मिला गलांडे, उपअभियंता पाटबंधारे अशोक शेटे, मंडल अधिकारी मा.प्रकाश बलकवडे, पवना धरणग्रस्त कृती समितीचे सर्व पदाधिकारी, आंद्रा व टाटा धरण प्रकल्पग्रस्त शेतकरी, प्रतिनिधी उपस्थित होते.

error: Content is protected !!