मुंबई:
अठराव्या शतकाच्या सुरूवातीला ब्रिटिश साम्राज्य भारतात प्रस्थापित झाले. इ.स, १८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर इ.स.१९४७ सालापर्यंत भारतीय नागरिकांनी देशावरील ब्रिटिशांचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी ९० वर्षे संघर्ष केलेला आहे.
या साठी हजारो भारतीयांनी बलिदान दिले तर लाखो भारतीय तुरुंगात गेले त्या सर्वांच्या संघर्षातून आणि बलिदानातून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारत देशाला १९४७ साली जे स्वातंत्र्य मिळाले ती भीक होती, देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्येच मिळाले” असे कंगना रानौत यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले आहे.


कंगनाच्या या वक्तव्यामुळे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा तसेच भारत देशाचा व भारत देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचा देखील अपमान केला गेला आहे. कंगणा रानौत यांनी जाणुन बुजून हे वक्तव्य केले आहे. कंगना राणौतचा नुकताच केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला आहे . त्यांचा हा पद्मश्री पुरस्कार केंद्र सरकारने परत काढून घ्यावा अशी मागणी मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली.


त्यांच्या या बेताल वक्तव्यामुळे प्रत्येक भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे आम्हाला वाटते कारण आम्ही “ देश हा देव असे माझा “ असे मानतो. त्यामुळे त्यांनी देशाची माफी मागितली पाहीजे. तसेच देशाच्या स्वातंत्र्य लढ्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कंगना राणौत वर केंद्र सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कारवाई केली पाहीजे. जर कंगणा रानौत वर कारवाई केली नाही तर उद्या दुसरा कोणी ही देशावर, देशाच्या स्वातंत्र्य लढल्यावर, नेत्यावर काही ही आक्षेपार्ह विधान करील ? म्हातारी मेल्याचे दुःख नाही काळ मात्र सोकावता कामा नये .

error: Content is protected !!