मुंबई:
एस.टी.कामगार न्याय मागण्यासाठी लढा देत असतील तर त्या कामगारांना “ मुंबई डबेवाला असोशिएशन” चा नैतिक पाठिंबा आहे. पण संपाचे हत्यार योग्य नाही, असे मत मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी व्यक्त केले.
तळेकर म्हणाले,”डबेवाले कामगार मुंबईत जवळ जवळ १३० वर्ष काम करत आहेत पण या १३० वर्षात डबेवाल्यांनी लौकिक अर्थाने संप कधी केला नाही.

आणि भुकेला कसला आला आहे संप !डबेवाल्यांच्या इतिहासात संप या शब्दाला थारा नाही. डबेवाले संघटनेचे नेते व मॅनेजमेन्ट गुरू कै.गंगाराम तळेकर नेहमी सांगायचे वाद-विवाद,मतभेद, गंभीर समस्या होतात अथवा काही अडचणीचे प्रसंग निर्माण झाले तर एकत्र बसुन त्यांवर चर्चा करून तोडगा काढा !जगात अशी कोणता समस्या नाही की माणुस त्यांवर बैठकीत बसुन तोडगा काढू शकत नाही. चर्चा करताना प्रत्येकाने दोन पाऊल मागे येण्याची मानसिकता दाखवली तर तोडगा नक्कीच निघू शकतो ?
एस.टी.कामगार व सरकारने दोन पाऊले मागे येऊन चर्चा केली तर तोडगा नक्कीच निघु शकतो. एस.टी. कर्मचार्यांना आमची विनंती आहे की तुम्ही संप करून महाराष्ट्रातील एस.टी.प्रवांशांना वेटीस धरू नका ? तो प्रवासी आहे म्हणुन तुम्ही आहात.


डबेवाले जरी मुंबईत काम करत असले तरी त्यांची गावे मुळशी,मावळ,खेड,आंबेगाव,जुन्नर तालुक्यात आहेत. आणी गावी जाण्यासाठी तो एस टी ने जातो… पण एस टी संपामुळे त्याचा आणी गावाचा संपर्क जवळ जवळ तुटला आहे.
गावी जाण्यासाठी खाजगी गाड्या उपलब्द आहेत पण त्या गाड्या प्रत्येक सिटा मागे एक हजार रूपये घेतात ? जेथे एस टी दोनशे रूपये घेते तेथे खजगी गाडीवाले एक हजार रूपये घेतात !
एस टी संप कधी मिटेल याची डबेवाला वाट पहातो आहे. आमची ही सरकारला विनंती आहे एस टी कर्मचारी यांच्या मागण्यांचा साधक बाधक विचार सरकारने करावा व त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात .

error: Content is protected !!