वडगाव मावळ:
ब्राह्मणवाडी (साते), येथील माध्यमिक शिक्षक संभाजी शिवाजी बो-हाडे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना मदतीचा हात देण्यात आला.
बो-हाडे त्यांच्या मित्र परिवारातील संजय शिंदे (मा. चेअरमन कान्हे विकास सोसायटी), राजेंद्र अनंत बो-हाडे( अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती ब्राम्हणवाडी ), स्वप्नील नवघणे, अमित नवघणे,
विलास पोपटराव शिंदे, वैभव नवघणे, अमर बो-हाडे,योगेश बो-हाडे यांनी सर्वेक्षण करून ब्राह्मणवाडी (साते), येथील काही निराधार, गरजू, ज्या घरात कोणी कमावते नाही, अशा कुटुंबांना अन्नधान्य (किराणा बाजार एक महिना पुरेल एवढे) कीट व मिठाई वाटप करून त्यांची दिवाळी गोड करण्याचा व गोरगरीब कुटूंबाचे आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना नारायण ठाकर ( अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना मावळ ) मार्गदर्शन करताना म्हटले की, समाजातील नागरिक व तरुणांनी हा आदर्श घेऊन , असेच समाजोपयोगी कार्य
वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देऊन करावे बो-हाडे सरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेला हा उपक्रम समाजाला दिशादर्शक आहे.
याप्रसंगी कैलास गायकवाड (अध्यक्ष राष्ट्रवादी युवक कांग्रेस मावळ), भाऊसाहेब आगळमे (मा. आदर्श सरपंच साते), संतोष जांभुळकर (मा. सरपंच),यांनीही शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी हनुमंत बो-हाडे (मा. ग्रामपंचायत सदस्य), मारुती रामदास शिंदे (मा उपसरपंच ), सखाराम काळोखे (उपसरपंच ), रवींद्र गायकवाड (मा. सरपंच), अनिल शिंदे (मा. उपसरपंच), सचिन आवटे (अध्यक्ष यशवंत पतसंस्था), संभाजी शिंदे (अध्यक्ष समर्थ पतसंस्था), सुरेश नवघणे (माजी अध्यक्ष), पांडुरंग बो-हाडे,सचिन खाणेकर, सुनील शिंदे, रुपेश खाणेकर, गजानन शिंदे, बंडू आगळमे, अमोल धिडे, सागर आगळमे, मंगेश आगळ्मे, सुभाष बो-हाडे,प्रदीप मोहिते, आनंद
नवघणे, संतोष आगळमे, लहू बो-हाडे , कैलास नवघणे, अमोल बो-हाडे,जितेंद्र बो-हाडे, रवींद्र बो-हाडे, अक्षय शिंदे, गिरीधर घारे, अजय केदारी, तुषार बो-हाडे, सागर बो-हाडे व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!