तळेगाव स्टेशन:
एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण करण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये संप चालू आहे. त्या अनुषंगाने राज्य परिवहन महामंडळाच्या तळेगाव आगारातील सर्व कर्मचारी संपामध्ये सामील झालेले आहेत.
त्यास पाठिंबा देण्यासाठी तळेगाव नगरीचे आधारस्तंभ जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर भाऊ आवारे यांनी कामगारांच्या संपास मार्गदर्शन केले व संप मिटे पर्यंत कामगारांच्या जेवणाची सोय केली.
तळेगाव आगारातील सर्व कामगारांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.
या संपामध्ये विशेष प्रयत्न महाराष्ट्र एस टी कामगार संघटना व महाराष्ट्र एसटी वर्कर्स इंटक काँग्रेस (छाजेड साहेब) या दोन्ही संघटनांचे आजी-माजीपदाधिकारी उपस्थित होते.
यामध्ये प्रामुख्याने संघटनेचे सचिव प्रमोद नकाते, संघटनेचे अध्यक्ष दीपक दगडखैर, इंटक् संघटनेचे अध्यक्षअमोल रणदिवे ,सचिव बबनराव पोटकुले,माजी सचिव कामगार संघटना विजय राऊत,पदाधिकारी बाळासाहेब करवंदे,बबनराव कांबळे,विजय चौरे, खजिनदार अमित साळवी,इंटक् कार्याध्यक्ष भरत कोकणे, महिला प्रतिनिधी संगीता तोटेवाड, सरिता कुलकर्णी, इंटेक पूनम कोळी, प्रणिता भालेराव इतर पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!