टाकवे बुद्रुक :
सह्याद्री प्रतिष्ठान आयोजित भव्य किल्ले बांधणी स्पर्धेत बालगोपाळांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. दिवाळी म्हटलं की नवीन कपडे, फटाके,रांगोळी, गोड फराळ तर आलाच पण त्यातही बच्चेकंपनीसाठी सर्वात आवडता विषय म्हणजे किल्ले बनवणे आपल्या महाराष्ट्रात किल्ल्यांना एक आगळेवेगळे स्थान आहे.
हे ऐतिहासिक किल्ले त्या छत्रपती शिवरायांनी आणि मावळ्यांनी केलेल्या पराक्रमाची साक्ष देतात. लहान मुलांमध्ये किल्ल्याविषयी व इतिहासाविषयी माहिती व्हावी म्हणूनच किल्ले बनवण्याची प्रथा सुरू झाली असावी त्यामुळेच सगळीकडे मातीचे किल्ले बनवण्यासाठी बच्चेकंपनी सरसावतात. दिवाळीत किल्ले बांधणीतून महाराष्ट्राचा मराठमोळा इतिहास, संस्कृतीची आठवण ताजी होते या हेतूने सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष सदानंद पिलाणे यांच्या संकल्पनेतून आंदर मावळातील टाकवे बु, गावांमध्ये मातीचे किल्ले बनवण्याची स्पर्धेचे आयोजन केले गेले.


दिवाळीत प्रत्येक घरापुढे रांगोळी, कंदील, एक लहानसा का होईना किल्ला हा दिसतोच, मातीचे किल्ले आणि दिवाळी हे एक अतूट नातं आपल्याकडे दिसून येतं सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून टाकवे बु. गावांमध्ये किल्ले बांधणी स्पर्धा आयोजन करण्याची ही पहिलीच वेळ असताना देखील बच्चेकंपनीने प्रचंड प्रतिसाद दिला. सध्या बाजारात रेडीमेड किल्लेही मिळतात मात्र रेडिमेड अथवा काल्पनिक किल्ल्यापेक्षा प्रत्यक्ष ऐतिहासिक किल्ल्याची प्रतिकृती बनवण्याकडे मुलांचा कल वाढू लागलेला आहे.
आणि त्यासोबतच मुले किल्ल्याच्या इतिहास देखील अभ्यासु लागली आहेत..किल्ले स्पर्धेचे परिक्षण गोकुळ लोंढे यांनी केले व मुलांना किल्ल्यांविषयी माहिती दिली, योगश गुणाट, रविंद्र असवले, उल्हास असवले, चेतन लोंढे, पवन क्षीरसागर यांनी किल्ले स्पर्धेच्या नोंदणी पासुन ते आयोजन करण्यात अथक परिश्रम घेतले.


वय वर्षे ३ ते इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांपर्यंत मुलां / मुलींनी या स्पर्धेत उस्फुर्त सहभाग घेतला. ५० पेक्षा अधिक किल्ल्यांची स्पर्धेत नोंदणी झाली होती.
काही ठिकाणी तर किल्ल्यांची हुबेहूब प्रतिकृती साकारली गेली होती, दिशादर्शक, किल्ल्यांचा इतिहास या सर्व बाबी योग्य पद्धतीने मांडल्या गेल्या व यामध्ये त्यांना त्यांच्या पालकांचे योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाले मुलांच्या आणि पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल परिसरात संस्थेमार्फत पालकांचे देखील आभार मानण्यात आले. व लवकरच सहभागी स्पर्धकांसाठी किल्ले लोहगड दुर्गदर्शन सहलीचे आयोजन करण्यात येणार आहे तसेच तारीख निश्चित करून पारितोषिक वितरणाचा सोहळा आयोजित केला जाईल असे आयोजकांडुन सांगण्यात आले.

स्पर्धकांचे निवडक किल्ले.
1)चैतन्य मोहन शिरसागर यानी बनवलेले किल्ले रायगड ची प्रतिकृती.
2) पायल दत्ता आंबेकर हिने बनवलेली सिंहगड किल्ल्याची प्रतिकृती.
3) आस्था अमित असलेले वय वर्ष तीन महिने साकारलेली शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती.
error: Content is protected !!