कामशेत:
दिवाळी आनंदाची,प्रकाशाची,फटाक्याची अतिषबाजीत नवचैतन्याची.यंदाची दिवाळी धुमधडाक्यात साजरी होत असतानाच कामशेत मधील तीन लेकरं मात्र दिवाळीत उपाशी पोटी झोपली, त्याच झाले असे या लेकरांची आई गरीबीचे चटक सोसीत लेकरांना संभाळीत आहे. ती ठेकेदारीत जाऊन मोलमजुरी करते.
पतीचे छत्र हरपल्याने तिच्या नशिबी मोलमजुरी आली. मोलमजुरी करून मिळालेल्या कमाईतून तिच्या लेकरांचे पोट भरते. याच कमाईतून घरभाडे द्यावे लागते. कसा बसे पोरांचे पोट भरणारी माऊली गरीबीचे चटके सोशीत जगत आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी सकाळी लेकीला दवाखान्यात घेऊन आली.


दिवसभराचे उपचार करून सायंकाळपर्यंत ती घरी पोहचली. घरात येऊन गॅसवर कुकर ठेवून त्यात डाळ,बटटा शिजायला ठेवले. कूकरच्या तीन शिट्या झाल्या. कुकर उतरून जमिनीवर ठेवला. आणि चपातीसाठी गव्हाचे पीठ मळायला घेतले. पाणी घ्यायला ही आई खाली वाकली आणि त्याच क्षणी कुकरचा ब्लास्ट झाला.
कुकर फुटला,फुटलेल्या कूकरच्या वाफेने माऊलीचा चेहरा भाजला. मान भाजली,हात भाजला ती जखमी झाली. तिच्या किंचाळ्याने,मुलांच्या हंबरडा फोडल्याने शेजारी धावून आले आणि या आईला कामशेतच्या महावीर हाॅस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले. कुकरच्या ब्लास्टने जखमी झालेल्या या आईचे नाव ,आशा गोपीनाथ ननवरे( वय ४८) असे असून ती कामशेतच्या भीमनगर मध्ये राहते
प्राची ,अमन ,अक्षय अशी तिची तीन लेकरे,आई जखमी झाल्याने तिन्ही मुले दिवाळीच्या दिवशी उपाशी झोपली. आशाबाई,रेल्वे ठेकेदारीत काम करते. हातावर पोट असलेल्या या महिलेचा मागच्या वर्षी काम करीत असताना हात मोडला होता,ते वर्षे संपते ना संपते तोच आता भाजून जखमी झाल्याने तिची आर्थिक विवेचना वाढली आहे.


कोरोनाच्या काळात सरकारकडून मिळालेल्या रेशनिंग वर या मायलेकरांचे पोट भरत होते. ऐन दिवाळीत ही तिन्ही भावंडे उपाशी राहल्याचे सांगताना या आईचे डोळे जखमी असताना डबडबले होते.
महावीर हाॅस्पिटलचे डाॅ. विकेश मुथा म्हणाले,”आनंदाच्या अशा क्षणी अशी घटना होणे दुर्देव आहे. कोरोना नंतर पहिलीच दिवाळी आनंदात साजरी होताना, ही घटना दु:खदायक आहे. ही महिला गंभीर जखमी असून आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. अशा प्रसंगी मदतीची गरज आहे.
अधिक माहितीसाठी:
9822403422,

error: Content is protected !!