टाकवे बुद्रुक :
मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या स्थानिक विकास निधीतून आंदर मावळातील पारीठेवाडी येथील दत्त मंदिरासमोरील सभामंडपाचे काम पूर्णत्वास गेले .
पारीठेवाडी पंचक्रोशीतील शेकडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दत्त मंदिर परिसरात सभामंडप बांधण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांनी आमदार सुनील शेळके यांच्याकडे केली होती .
या अनुषंगाने वहीत नमुन्यातील प्रस्ताव ग्रामपंचायतीने दाखल केला होता .आमदार सुनिल शेळके यांच्या स्थानिक विकास निधीतून सभामंडपाच्या कामासाठी तातडीने निधी उपलब्ध करून दिल्याने सभामंडपाचे काम पूर्ण झाले. या पंचक्रोशीतील दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भाविकांची गैरसोय टाळावी म्हणून येथे सभामंडप असणे आवश्यक होते .


या अनुषंगाने आमदार सुनील शेळके यांनी तातडीने निधी उपलब्ध करून दिल्याने गावकऱ्यांनी आमदार सुनिल शेळके यांचे आभार मानले .आंदर मावळ याच्या पश्चिम भागातील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या पारीठेवाडी ला धार्मिक व सांस्कृतिक वसा लाभला आहे .पारीठेवाडी तील अखंड हरिनाम सप्ताह महादेवी देवीची यात्रा यात होणारे विविध कार्यक्रम याची फार मोठी रेलचेल असते. बाराही महिने भारतीय संस्कृतीचे सण-समारंभ , उत्सव
यात गावकऱ्यांचा मोठा सहभाग असतो.
गावातील सुखदुःखाच्या अनेक कार्यक्रम दत्त मंदिर परिसरातल्या प्रांगणात होत असतात. त्यामुळे या सभामंडपाच्या चा उपयोग गावातील सर्व सण-समारंभ कार्यक्रम यांना उपयुक्त ठरणार आहे .आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने आमच्या गावात विकास कामांची होत असल्याने आम्ही समाधानी असल्याच्या प्रतिक्रिया गावक-यांनी दिल्या .
याशिवाय मावळ तालुक्यातल्या 56 गावातील पाणीपुरवठा योजना राबवून लवकरच महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरेल हा आमदार शेळके यांनी दिलेला शब्द खरा ठरेल असा विश्वासही महिलांनी बोलून दाखवला .
आमदार सुनील शेळके यांच्या विकासाचा झंझावात केवळ शहरी भागातच नसून खेडोपाडी पोचला आहे. त्यातून सभामंडप व्यायाम शाळा ,सांस्कृतिक भवन, पाणीपुरवठा योजना ,स्मशानभूमी निवारा शेड, स्मशानभूमी ही कामं मार्गी लागल्याने खेड्यापाड्यातील गावकरी देखील आमदार सुनिल शेळके यांच्या कामावर संतुष्ट आहेत.

error: Content is protected !!