तळेगाव दाभाडे:
शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने नशामुक्त भारत चळवळीला तसेच एनसीबी व समीर वानखेडे यांना पाठिंबा देण्यासाठी आज मानवी साखळी आंदोलन करण्यात आले.
या प्रसंगी, तळेगांव दाभाडे शहरातील जिजामाता चौकात, या चळवळीला पाठिंबा दर्शविण्यासाठी एक फलक लावण्यात आला .ज्यावर सर्व सामान्य नागरिकांनी आपली स्वाक्षरी करून या चळवळीला पाठींबा द्यावा असे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.नागरिक व पदाधिकाऱ्यांनी या चळवळीला आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला.
भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे म्हणाले,” समीर वानखेडे क्रूझ ड्रग केस मध्ये पुराव्याच्या आधारे चौकशी करत आहेत, त्यांना त्यांच्या जातीधर्मावरून, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरून सरकारातील काही मंत्र्यांकडून विनाकारण त्रास दिला जात आहे.
त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर वेगवेगळे आरोप करण्यात येत आहेत. त्यांच्या अश्या वागण्याने असे धडाडीचे अधिकारी मनोबल खच्चीकरण झाल्याने कधीच पुढे येऊन देशकल्याणाचे कार्य करू शकणार नाहीत. म्हणून अश्या पाय खेचणाऱ्या दुष्टप्रवृत्तीचा जितका निषेध करावा तितका थोडा आहे.
भाजपा तळेगांव दाभाडे शहराध्यक्ष रवींद्र माने म्हणाले,” देशहिताचे कार्य करणारे अधिकारी जर काम नाही करू शकले .तर आपली तरुण पिढी या ड्रगच्या विळख्यात अडकेल.जे संपूर्ण देशाचे नुकसान असेल. म्हणून अश्या अधिकाऱ्यांना सर्वसामान्य नागरिकांनी पाठिंबा देणे आवश्यक आहे. आपण मानवी साखळी बनवून आपली एकी व आपला पाठिंबा दाखवून देऊ. जात, धर्म, भाषा या पलीकडे जाऊन देशहिताला पाठिंबा हेच आपले ब्रीद आहे व राहील.
कामगार आघाडी अध्यक्ष अशोक दाभाडे,उपाध्यक्ष विनोद भेगडे, युवती सरचिटणीस तेजल भेगडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
पुणे जिल्हा सरचिटणीस अविनाश बवरे, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, मावळ तालुका युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, अनुसुचित जाती मोर्चा पुणे कार्याध्यक्ष ओबीसी मोर्चा सरचिटणीस आशुतोष हेंद्रे, उपाध्यक्ष सतिष पारगे, माजी सभापती निलेश मेहता,भाजपा नेते .सुनील भेगडे,दिपक भेगडे, सचिव महावीर कणमुसे, तळेगांव दाभाडे शहर सरचिटणीस विनायक भेगडे, रविंद्र साबळे, शोभा परदेशी, प्रभारी वैभव कोतुळकर, शहर उपाध्यक्ष श्री.संजयभाऊ दाभाडे, हिम्मत पुरोहित, सुधीर खांबेटे,प्रशांत शिळीमकर,संजयभाऊ जाधव, नगरसेविका शोभा भेगडे, ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी अध्यक्ष अनिल वेदपाठक, उपाध्यक्ष विजय पंडीत, महिला मोर्चा कार्याध्यक्षा अश्विनी काकडे, संघटनमंत्री हेमा इंदुलकर, प्रसिद्धीप्रमुख सोनाली शेलार,
युवती आघाडी अध्यक्ष अपूर्वा मांडे, कार्याध्यक्षा,धनश्री बागले,उपाध्यक्ष वैष्णवी पाटील,कु.शेलार,उपाध्यक्षा ज्योती वैद्य,संजय वैद्य, युवा मोर्चा अध्यक्ष शिवांकुर खेर, सचिव श्री.प्रसाद भेगडे, कामगार आघाडी उपाध्यक्ष अनिल शेलार, कार्याध्यक्ष स्वप्नील भेगडे, व्यापारी आघाडी अध्यक्ष श्री निर्मलकुमार ओसवाल, सोशल मीडिया अध्यक्ष.उपेंद्र खोल्लम, कार्याध्यक्ष सचिन भिडे, युवा कार्यकर्ता श्री.विवेक जव्हेरी, माजी सरचिटणीस समीर भेगडे, विनीत भेगडे, ललीत गोरे, किशोर जाधव, सार्थक जाधव, विराज जाधव, पियुष जाधव तसेच मोठ्या संख्येने पक्ष कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र साबळे यांनी सुत्रसंचालन केले.सचिन भिडे यांनी आभार मानले.कार्यक्रमाचे नियोजन सरचिटणीस विनायक भेगडे आणि ओबीसी मोर्चा प्रसिद्धीप्रमुख अमित भागीवंत यांनी केले.

error: Content is protected !!