वडगाव मावळ :
वडगाव नगरपंचायतच्या स्विकृत सदस्यपदी शहर भाजयुमोचे माजी अध्यक्ष रविंद्र काकडे यांना संधी देत देण्यात आली. नगरपंचायत कार्यालयात काकडे यांच्या निवडीची अधिकृत घोषणा पिठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष मयूर ढोरे व मुख्याधिकारी जयश्री काटकर यांचे उपस्थितीत करण्यात आली.
भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त करत रविंद्र काकडे यांची नगरपंचायत पासून वाद्यपथकासह त्यांच्या निवासस्थानापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
याप्रसंगी भाजपाचे जेष्ठ नेते,प्रभारी भास्करराव म्हाळसकर,माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी,निवृत्तीभाऊ शेटे,गुलाबराव म्हाळसकर,माजी उपसभापती शांताराम कदम मावळ भाजपा महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे,वडगाव शहर भाजपाचे अध्यक्ष अनंता कुडे, गटनेते दिनेश ढोरे, विरोधी पक्षनेत्या अर्चना म्हाळसकर, मा अध्यक्ष किरण भिलारे, मनोज ढोरे,नगरसेवक प्रविण चव्हाण,किरण म्हाळसकर,दिलीप म्हाळसकर, सुनिता भिलारे,दीपाली मोरे,मा सरपंच बापूसाहेब वाघवले, नितीन कुडे,संभाजी म्हाळसकर,सुधाकर ढोरे, मा नगरसेवक ऍड विजयराव जाधव,प्रसाद पिंगळे,शामराव ढोरे,भुषण मुथा,सोमनाथ काळे, महिला अध्यक्षा धनश्री भोंडवे,सरचिटणीस वैशाली म्हाळसकर,युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे,रमेश ढोरे,शेखर वहिले,कल्पेश भोंडवे,आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदर्श मित्र मंडळ या ठिकाणी कोपरा सभा घेऊन सांगता झाली.

error: Content is protected !!