टाकवे बुद्रुक:
सी. ई. टी. च्या परीक्षेत मंजुश्री बाळासाहेब घाडगे हिला 88 % गुण मिळवून उत्तीर्ण झाली., कोणताही खाजगी क्लास न लावता घरी राहून, आईला घरातील कामाला हातभार लावून अभ्यास करून आणि तेही सर्व इंग्रजी माध्यमाचा अभ्यास करताना खूप मेहनत करून यश मिळवले आहे, तिचे पुढील स्वप्न बी एस ची ऍग्री करायचे आहे.
बालवाडी ते इयत्ता ६ पर्यंत आज्जी/आजोबांकडे शिक्षण, ६ ते दहावी पर्यंत सेवाधाम आश्रम शाळा माळेगाव खुर्द ११ ते १२ पर्यंत हुतात्मा राजगुरू महाविद्यालय खेड येथे आणि कोणताही क्लास न लावता कोणाचेही मार्गदर्शन नसताना, घरची सर्व कामे करून, आईला कामात मदत करून अभ्यास करून आळंदी येथे c e t ची परीक्षा दिली.
परीक्षा केंद्रात शेकडो मुले मुली त्यात सर्विकडे कॅमेरे लावलेले, सर्व पेपर इंग्रजी माध्यमातुन, अशा परिस्थितीत पेपर सोडवले, पुणे जिल्ह्यातील आणि मावळ तालुक्यातील शेवटच्या टोकाचे माळेगाव गावातील ही विध्यार्थीनी, कोणत्याच शिक्षकाचे मार्गदर्शन नसतानाही फक्त पुस्तक वाचून अभ्यास केला, एक एक पुस्तक ७०० /८०० रुपयाचे अशा परिस्तिथीतुन अभ्यास केला.

error: Content is protected !!