
कामशेत:
वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महावीर हाॅस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ विकेश मुथा यांना राज्यस्तरीय प्राइड ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.शब्द पब्लिसिटी ही गेल्या २० वर्षापासून देशभर मीडियाची सेवा देणारी संस्था आहे.
या वर्षी कोरोनामहामारीत वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा राज्यस्तरीय प्राइड ऑफ महाराष्ट्र पुरस्कार सोहळा प्रदान करण्यात येणार आहे. कोरोना काळात उल्लेखनीय कार्याबद्दल मुथा यांचा या संस्थे मार्फत गौरव केला जाणार आहे. २९/१०/२०२१ ASM कॅम्पस मुंबई पुणे हायवे लगत स्टर्लिंग होंडाच्या मागे पिंपरी पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार,आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते हा गौरव सोहळा होणार असल्याची माहिती आयोजक शिवाजी घोडे यांनी दिली.
- रवि ठाकर एक जिवलग मित्र
- हर घर तिरंगा अभियान गावोगावी राबवणार : माजी राज्यमंत्री बाळा भेगडे
- हिंदू उत्सव समिती व कामशेत ग्रामस्थांकडून स्वराच्या कुटुंबियास मदत
- सरकार कोणाचेही असो,आमच्या सुरक्षिततेबाबत ही उदासिनता का?
- कोथुर्णे घटनेतील नराधमाला फाशी द्या; या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे आमरण उपोषण

