कामशेत:
कामशेत शहरात छञपती शिवाजी महाराज रिक्षा चालक मालक वेलफेअर असोशियसनच्या पहिल्या शाखेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.सुर्यकांतजी वाघमारे [ मा.नगराध्यक्ष लो.न.पा ] यांच्या हस्ते झाले. तसेच शाखा क्र २ कामशेत रेल्वे स्टेशन येथील नामकरण फलकाचे अनावरण मावळ पंचायत समितीच्या सभापती ज्योतीताई शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले .
या शाखेच्या अध्यक्ष पदी सिद्धार्थ चौरे तसेच उपाध्यक्ष पदी कैसर शेख यांची निवड करण्यात आली .यावेळी डाॕ. विकेश मुथा,शिवसेना नेते गणेश भोकरे ,रावळशेठ, गणेश केदारी ग्रा पं सदस्य अर्जुन शिंदे,परमारशेठ,संदिप चौरे माजी उपसरपंच अमर चौरे ,कामशेत पोलिस ठाणे पवार साहेब व पद्धाधिकारी रिक्षा संघटनेचे सर्व सभासद उपस्थित होते.
सुयकांत वाघमारे साहेब व सभापती ज्योती शिंदे .डाॕ विकेश मुथा यांनी सर्व रिक्षा चालकांना शुभेच्छा दिल्या.
डाॅ. विकेश मुथा म्हणाले,” इनामे इतबारे रिक्षा चालवून नागरिकांची सेवा करणारे माझे रिक्षाचालक बांधव अत्यंत प्रामाणिक आहे. वाढते इंधन दराने त्यांच्या उत्पन्नावर फरक पडला आहे. अडीअडचणीच्या वेळी सर्वात पहिले धावून येण्यात माझ्या रिक्षाचालक बांधवाचा वरचा क्रमांक आहे.

error: Content is protected !!