वडगाव मावळ:
आमदार सुनिल शेळके व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाप्पू साहेब भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी उपसरपंच दिलीप पोपटराव राक्षे यांनी पवन मावळातील चांदखेड-महागाव या जिल्हा परिषदेच्या गणातील प्रत्येक गावातील महिला भगिनींसाठी खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दिलीप राक्षे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास गावागावांतून महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याने खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाची पवन मावळात चर्चा रंगत आहेत.
खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांसाठी आयोजकांनी आकर्षक बक्षिसे देखील ठेवली असल्याने हा कार्यक्रम आपल्या गावात केंव्हा होणार याची पवन मावळातील महिलांना आतुरता निर्माण झाली आहे. या कार्यक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांसाठी पैठणी ,सोन्याची नथ व कंबरेचा छल्ला हि बक्षिसे देण्यात येत आहेत.
नुकतीच ही स्पर्धा पवन मावळातील थुगाव, कडधे व अढले खु. या गावांमध्ये पार पडली. थुगाव येथील सोनाली उमेश सावंत या पैठणीच्या मानकरी ठरल्या आहेत तर अश्विनी ऋषिकेश बोडके या सोन्याची नथ व बारकाबाई भरत पोटफोडे या कंबरेचा छाल्ल्याच्या मानकरी ठरल्या आहेत. तसेच कडधे येथील स्पर्ध्येत उज्वला साईदास गोसावी या पैठणीच्या मानकरी ठरल्या आहेत तर रुपाली गोपाल तुपे या सोन्याच्या नथीच्या मानकरी ठरल्या आहेत. आढले खुर्द येथील स्पर्ध्येत सुप्रिया सुधीर येवेले या पैठणीच्या मानकरी ठरल्या आहेत तर गौरी विजय जगदाळे या सोन्याची नथ व सीमा नंदू घोटकुले या कमरेचा छाल्ल्याच्या मानकरी ठरल्या आहेत.
दिलीप राक्षे यांच्या कडून महिला भगिनींसाठी राबविण्यात येणाऱ्या खेळ रंगला पैठणीचा या स्पर्धात्मक कार्यक्रमामुळे गावागावातील महिलांच्या कला गुणांना वाव मिळत आहे.

error: Content is protected !!