वडगाव मावळ:
मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष कैलास गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते,गायकवाड समर्थक , युवा पर्व फाऊंडेशन,आणि मावळ एकता युवा मंचाच्या कार्यकर्त्यानी आंदर मावळातील गावोगावी जाऊन भव्य रॅली काढून ग्रामदैवतांचे आशीर्वाद घेत नागरिकांशी सुसंवाद साधला.
गावोगावी गायकवाड यांचे जल्लोषात स्वागत करीत औक्षण केले.
गायकवाड यांनीही ज्येष्ठ, वडीलधारी मंडळी,माता भगिनींचे आशीर्वाद घेत वाढदिवस साजरा केला.कामशेत जवळील गुरुदत्त मंगल कार्यालयात झालेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात आमदार सुनिल शेळके, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे,संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे ,स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे, बाबुराव वायकर,विठ्ठलराव शिंदे, गणेश खांडगे, गणेश ढोरे,किशोर भेगडे, किरण गायकवाड, शिवसेना तालुकाप्रमुख राजुभाऊ खंडभोर,सुभाष जाधव, गणेश काकडे, दीपक हुलावळे, , संचालक बाळासाहेब गायकवाड, सुनिल भोंगाडे, नारायण ठाकर, शिवाजी असवले, बाळासाहेब भानुसघरे, विलास मालपोटे, तानाजी दाभाडे ,विष्णु गायखे, सुरेश गायकवाड,भरत येवले, प्रकाश आगळमे, राज खांडभोर, विजय सातकर, मारुती असवले आदी नेतेमंडळी व असंख्य कार्यकर्तेनी शुभेच्छा दिल्या.
आप्तस्वकीय व मित्रमंडळींबरोबर साजरा केलेला या वर्षाचा वाढदिवस अधिक उत्साही व आनंदी झाला. आतापर्यंत केलेल्या कामाची मित्रमंडळीनी दखल घेत साजरा केलेल्या वाढदिवसानी काम करण्याची अधिक उर्जा मिळाली असल्याचे मावळ तालुका राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष कैलास गायकवाड यांनी सांगितले.

error: Content is protected !!