टाकवे बुद्रुक:
मानकुली येथे काकडा आरती सोहळा उत्साहात सुरू आहे. कोजागिरी पौर्णिमा पासून सुरू झालेल्या या सोहळ्यामुळे गावात भक्तीमय वातावरण आहे. भल्या पहाटे विठूनामाचा जयघोष करीत सुरू झालेल्या काकडा आरती सोहळ्यात गावकरी मोठया भक्तिभावाने सहभागी होत आहे.
कोजागरी पौर्णिमा पासून सुरू झालेला हा सोहळा त्रिपुरारी पोर्णिमा पर्यत सुरू राहणार आहे. ह.भ.प.काळुराम महाराज घाग ,दामु घाग,तानाजी घाग, ज्ञानदेव घाग, रामभाऊ धिंदळे,रघुनाथ एरंडे, प्रशांत कावडे, सखाराम गोपाळे,सिताराम झडे , गणेश घाग,देवदास एरंडे , प्रकाश घाग रोज‌ सर्वाच्या साथीने काकडा आरती सोहळा भक्तीमय वातावरणात पार पाडीत आहे.

error: Content is protected !!