मावळमित्र न्यूज विशेष: पवन मावळ पवना धरणाचा विस्तृत जलाशय आणि हिरवागार निसर्ग असणाऱ्या पवनेकाठच्या ब्राम्हणोली गावात जन्मनेला माणसातील माणूस ! ब्राह्मणोली गावच्या काळे परिवारात जन्मलेले भारत लक्ष्मण काळे कुटुंबाकडून वारकरी संप्रदायाचा वारसा जोपासत आहे. हा वसा त्यांना जन्मजात मिळाल्याने लहानपणापासूनच संस्काराचा स्पर्श व्यक्तिमत्वास लाभला. ग्रामीण व शेतकरी कुटुंब असुनही वडील लक्ष्मण उर्फ बाळासाहेब काळे पाटबंधारे विभागात असल्याने पालकांनी शिक्षणाला प्राधान्य दिल्याने व शिस्त कडक असल्याने प्राथमिक शिक्षण- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ब्राम्हणोली येथे माध्यमिक शिक्षण पवना विद्या मंदिर व नागेश्वर विद्यालय पाटस ता.दौंड येथे तर
उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण गोपीनाथ महाविद्यालय- वरवंड ता.दौंड आणि शिक्षक पदवी शिक्षण कात्रज आंबेगाव येथील अभिनव बी.एड कॉलेज येथे पूर्ण केले BSc BEd पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यात्यानंतर २००७ मध्ये मावळभूषण,शिक्षण महर्षी कृष्णराव भेगडे साहेब, संस्थेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, व संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांनी ऐतिहासिक नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित पवना विद्या मंदिर पवनानगर या त्यांच्याच मातीत २००७ मध्ये अध्यापक म्हणून काम करण्याची संधी दिली शिक्षणक्षेत्रात प्रवेश केला. तेव्हापासून ते आजपर्यंत आपल्याच मातीतील पवना शिक्षण संकुल पवनानगर या ठिकाणी अध्यापनाचे कार्य करत आहेत. परिसराची व या परिसरातील शालेय विदयार्थ्यांच्या समस्या व अडचणींची जाणीव असल्याने शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना अनेकविध संधी उपलब्ध व्हाव्यात, त्यांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी तळमळीने कार्यरत असणारा शिक्षक आपल्याला भारत काळें मधून दिसतो प्रत्येक हिऱ्याचे असंख्य पैलू ज्याप्रमाणे, त्याचे सौंदर्य वृद्धिंगत करत असतात अगदी त्याप्रमाणेच श्री भारत काळे यांनी आपले व्यक्तिमत्व स्वकतृत्वातून बहुआयामी बनवले आहे.२००९ पासून पवनमावळ व परिसरातील प्रश्न व समस्यांना सकाळ वृत्तपत्राच्या माध्यमातून समोर आणण्याचे व ज्वलंत प्रश्न
प्रश्न सोडविण्याबाबत ठोस उपाययोजनांची पाठपुरावा करण्यात ते यशस्वी ठरणारे निर्भिड पत्रकार म्हणून आज मावळ पंचक्रोशीत ते ओळखले जातात. पत्रकारीतेच्या माध्यमातून अनेक राजकीय पक्षश्रेष्ठींशी व कार्यकत्यांशी संपर्क येणे सहाजीक असते. माझे काम माझ्या माणसांच्या विकासासाठी हे तत्व अंगी बानवून तसेच वाणीत गोडवा, मित्रत्वाचा भाव व मनमिळाऊ स्वभाव अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे सर्वच राजकीय पक्षांना आपला वाटणारा माणूस आपल्या निक्वार्थी मनमिळावू आणि मदतीसाठी २४ तास तयार असणाऱ्या भारत काळेंनी मित्रत्रपरीवार मात्र मोठा कमावला ‘मी जीवाभावाने जोडलेली माझी माणके म्हणजे माझी श्रींमती व संपत्ती असे म्हणतात..
तसेच आपल्या उत्कृष्ट निवेदन कौशल्यातून अनेक कार्यक्रम, ‘व’ लग्नसमारंभांची ते शोभा वाढवतात त्याचबरोबर क्रिकेट व हॉलीबॉल खेळांची प्रचंड आवड मावळ प्रांताचे वैशिष्ट्य असणाऱ्या ढोल लेझीम प्रथकाची कला आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवून पारंपारिक कला वा संस्कृतीचा वारसा अनेक अभिनव उपक्रमांद्वारे आपल्या विद्यार्थ्यांना शिकवून ते नव्या रूपाने ते विद्यार्थ्यांमध्ये रुजवत आहेत
सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून शिक्षकांची असणारी नूतन महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक व सेवकांची पतसंस्थेचे अध्यक्ष,तज्ञ संचालक तसेच ग्रामीण भागातील साते येथील पहिली संगणीकृत असणारी यशवंत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, पवनानगर येळसे येथील शंभुराजे ग्रामीण सहकारी पतसंस्था येथे उत्तम काम करून सहकारी क्षेत्रातही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.कुटूंबीयांमध्ये मोठा मुलगा म्हणून आपल्या सर्व जबाबदाच्या आदर्शवत सांभाळणारा पुत्र, पती, पिता, भावंडामध्ये आधारस्तंभ म्हणून ओळखला जाणारा मोठा भाऊ, मित्रमंडळींना प्रत्येक प्रसंगात भक्कम साथ देणारा दिपस्तंभ !माझ्या ग्रामीण भागाचा,माझ्या गावाचा विकास झाला पाहिजे त्यासाठी अनेक दानशूर व्यक्तींकडून देणगी गोळा करायची व गावासाठी द्यायची येथील तरुण वर्गाचा विकास झाला पाहीजे या प्रामाणिक भावनेने कार्यरत असणारा कार्यकर्ता विद्यार्थ्याच्या सर्वांगिण विकासासाठी झटणारा आदर्श शिक्षक अशा अनेक मौल्यवान रत्नांनी भारत यांचे हे ठाक व्याक्तमत्य झळकत आहे
ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबात जन्मलेले रत्न आज पवनमावळ पंचक्रोशीत ग्रामविकासासाठी मनापासून कार्य करणाया तरुणाईच्या गळ्यातील ताईत ठरत आहे. जीवन जगावे तर चंदनासारखे आपल्या सहवासातील प्रत्येक व्यक्तीचे जीवन आनंदाने सुगंधित करणारे हे व्यक्तीमत्व सोबत येतील त्यासवे दिप एक लावूनी मनगटाच्या या बळावर विश्व हे जिंकायच रे पुढेच जायचे रे पुढेच असा ठाम निश्चय असणारे हे व्यक्तीमत्व
आजच्या विज्ञान आणि सोशल मिडीयाच्या जाहिरातीच्या युगात रोबोट बनून फक्त स्वार्थ्यासाठी जगाच्या हितासाठी नाळ जोडणाऱ्या समाजात माणसातील माणुस बनून एक आदर्श निर्माण करणारे हे व्यक्तिमत्व!
उजाड माळराणावर पायवाट निर्माण करणाऱ्याला निश्चितच काट्या कुट्यांचा व बोचणाऱ्या दगडांना तूडवत पुढे जावे लागते पण एकदा पायवाट निर्माण झाली की तीचा रस्ता तयार व्हायला वेळ लागत नाही.दुसऱ्याने तयार केलेल्या पायवाटेवरून चालण्यापेक्षा स्वतः पायवाट तयार करून अनेकांचा प्रवास सुकर करावा अशा विचारांचा प्रवाह जनमानसात रुजवणारे हे व्यक्तिमत्व मंगेश पाडगावकरांच्या कवीतेप्रमाणे
माणसांच्या गर्दीत या ‘माणूस’ शोधतो मी त्यांच्या कवीतेतील माणूस भारत काळेंच्या रूपाने भेटतो.

error: Content is protected !!