वडगाव मावळ:
मावळ करांनो तुम्ही मला आमदार द्या मी तुम्हाला भरभरुन देईन असा शब्द दिला होता.तुम्ही शब्द पाळला आता माझा शब्द पाळायची वेळ आहे,असा विश्वास हजारो नागरिकांच्या साक्षीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मावळ करांना दिला. निमित्त होते मावळातील विविध विकास कामांची भूमिपूजन ,यावेळी वडगाव मावळ येथे झालेल्या ऐतिहासिक सभेत दादांनी हा विश्वास दिला.


मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकारातून मावळाला सुमारे सातशे कोटीचा विकास निधी मंजूर झाला असून त्यातील तीनशे कोटी रूपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आमदार निलेश लंके, आमदार अतुल बेनके, माजी मंत्री मदन बाफना, माजी आमदार कृष्णराव भेगडे, ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे यांच्या उपस्थितीत झाले.
तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे वडगाव शहरातून पुष्पवृष्टी, फटाक्यांची अतिषबाजी करून, ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. मावळच्या इतिहासात उपमुख्यमंत्री पवार यांचे इतके जंगी स्वागत करण्याची ही पहिली वेळ.
आमदार सुनिल शेळके यांच्या कार्यकौशल्याचे कौतुक करीत पवार म्हणाले,
आपण नवीन रोज काहीतरी शिकले पाहीजे, त्यात
संकुचित न राहता काम करायला हवे. सरकार
चालवताना अनेक संकटे आली, त्यामध्ये कोरोना,
वादळ, पुर आले, असे असताना आघाडी सरकार
जनतेच्या पाठीशी उभी राहिली. त्यामुळे राष्ट्रवादी
कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहणे हे आद्य कर्तव्य, संस्कृती
आहे
अजित पवार म्हणाले, आमदार निधी वाढवून ४ कोटी केला आहे.विकास कामांचा दर्जा चांगला असावा.या निधीचा योग्यउपयोग व्हायला हवा कारण हा जनतेच्या घामाचा पैसा आहे. विकास करताना कोणाला वा-यावर सोडता येणारनाही, त्यामुळे काम करायची असतील तर सुनीलशेळके यांनी केलेल्या कामांप्रमाणे सगळी कामे उत्तम प्रकारची असावी .
विकासकामांविषयी बोलताना त्यांनी कामशेतपुलाबाबत मिश्किल टिपणी सुद्धा केली. एकीकडे पेट्रोल, गॅस, डिझेल किंमती वाढल्यामुळे जगणं मठिकल झाले आहे अच्छे दिन येणार होते काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे म्हणाले,” राज्यात व देशात कितीही आर्थिक संकट आली तरी आमदार सुनिल अण्णा एवढा मोठा निधीचे गिफ्ट काही कमी नाही. भाजपात आम्हाला ग्रहण होते. दादांनी विश्वास टाकला.पडलेल्या उमेदवाराला विरोधी पक्ष नेते दिले ते फक्त राष्ट्रवादीत होते. दुसरी कडे नाही. जे बोलतात ते दादा करतात नाही, जे नाही बोलत ते पण करतात असे सांगून मुंडे म्हणाले,” सुनिल अण्णाच्या डोळ्यात पाणी पहिले. माणसातील हा माणूस माणसं विश्वास तोडणार नाही हा विश्वास पाहिला.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,महिला अध्यक्षा भारती शेवाळे,संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, जिल्हा राष्ट्रवादीतचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश खांडगे, माजी तालुकाध्यक्ष गणेश ढोरे,नगराध्यक्ष मयूर ढोरे, बाळासाहेब ढोरे, चंद्रकांत सातकर, नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद,पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
आमदार सुनिल शेळके म्हणाले,” माझा परिवार लहान असला तरी मावळ हाच माझा परिवार.कोरोनात गेलेल्या रस्त्यावर सोडणार नाही. दादाचे प्रेम नाकारू शकत नाही. विकासासाठी पळतो, आणि आपणही पाठिंबा देता. पै पै हिशोब जनतेच्या कामासाठी लावीन,तुमाला शोभेल असे काम करून दाखवीन.जशाच तसे उत्तर देऊ राजकारणात डिस्टर्ब करू नका.पवना गोळीबाराची चौकशी करायला भाजपचे विरोधी पक्षनेते अकरा वर्षानी आले. दादा,मावळ गोळीबारात उडालेले शिंतोडे पुसून काढण्यासाठी आजचा हा ऐतिहासिक सोहळा आहे.या अंदोलनात मृत्यू मुखी पडलेल्या शेतक-यांच्या वारसांची नोकरी भाजपने नाकारली.
शेळके म्हणाले,” गोळीबारात जे जखमी त्यांना दाखवायला आणले, ते सगळेच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. मो ही भाजप मध्ये होतो,भाजप पक्ष नाही ती लिमिटेड कंपनी आहे.मला पुढची कसली भूक नाही मंत्री पदाची अपेक्षा नाही.
आमदार निलेश लंके म्हणाले,” अजित दादा म्हणजे हुकमी एक्का हा एक्का आमच्या हदयात आहे. राष्ट्रवादी हे कुटूंब,याचे आम्ही सदस्य आहोत.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे म्हणाले,” १९९५ पासून पुढे झालेल्या पाच टर्म च्या निवडणुकीत काँग्रेस आणि त्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस यांचे उमेदवार पराभूत झाले. पराभवाच्या मताची बेरीज ऐंशी हजार मत होतात,आमदार सुनिल शेळके विजयी त्र्याण्ण्णव हजाराची मतांनी मागील कसर भरून काढून शेळके विजयी झाले.
मयूर ढोरे,गुलाबराव वरघडे,अरूणा पिंजण,रामनाथ वारींगे,संतोष जांभुळकर,अजिंक्य टिळे,पंढरीनाथ ढोरे,संजय बाविस्कर,गोकुळ किरवे, अनिल तुपे,बंदिस्त जलवाहिनी तील जखमी, वामन वारींगे,विलास कुटे,उत्तम बोडके, शहाजी कडू, अनिल कुटे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपाला रामराम ठोकीत राष्ट्रवादीत प्रवेश करून हातात घडयाळ बांधले.

error: Content is protected !!