टाकवे बुद्रुक:
आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसा निमित्त शिवाजी असवले मित्र परिवाराच्या वतीने टाकवे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. आमदार शेळके यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा व्हावा यासाठी भैरवनाथ मंदिरात मोफत आरोग्य तपासणी शिबीर,कपडे साड्यांचे वाटप ,अन्नदान वाटप,लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.
कुलस्वामीनी महिला बचत गटाच्या तालुका अध्यक्षा सारीका सुनील शेळके,पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठलराव शिंदे,राष्ट्रवादीचे माजी तालुका अध्यक्ष गणेश ढोरे,माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे पु जि रा कॉग्रेसचे अध्यक्ष काळूराम मालपोट मा. पं समिती सदस्य लक्ष्मणराव बालगुडे संजय गाधी योजना समिती अध्यक्ष नारायण ठाकर, जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम,महिला तालुका अध्यक्षा सुवर्णा राऊत,युवक कॉग्रेस तालुका अध्यक्ष विलास मालपोटे,प्रदेश सचिव विक्रम कदम, युवक अध्यक्ष कैलास गायकवाड, हभप रोहिदास महाराज धनवे, आंदर मावळ अध्यक्ष मारुती असवले,सरपंच भुषण असवले उपसरपंच ऋषीनाथ शिंदे सरपंच विजय सातकर, माजी सरपंच प्रकाश आगळमे, उपसरपंच जालिंदर गाडे, संतोष नरवडे नवनाथ पडवळ, बळीराम मराठे, सोमनाथ पवळे ,पांडुरंग कोयते अनिल जाधव, स्वामी जगताप ,अनिल असवले, अनिल मालपोटे ,दिगंबर आगिवले, भगवान पवार, अविनाश असवले ,सोमनाथ असवले ,दत्ता घोजगे, परशुराम मालपोटे, रघुनाथ मालपोटे, गणेश गाडे, गोरख मालपोटे शेखर मालपोटे ,विकास ना असवले, रमेश जाचक, गजानन खरमारे, सुरेश चोरघे ,मनोज जैन, शांताराम साबळे ,तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्या ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
जग कोविड सोबत संघर्ष करत असताना, दुर्लक्ष झाले ते अन्य आजरांकडे.त्याच आजरांनपैकी लोकांना असेकाही आजारांना तोंड द्यावं लागतं जे कुणाला लवकर सांगता ही येत नाही आणि लपवता ही येत नाही.
या दोन वर्षांच्या काळात,परिस्थिती मूळे बदललेली जीवनशैली आणि आहरामुळे मूळव्याध,फिस्टुला, भगंदर, बांधकोष्टाता असलेल्या रुग्णांमध्ये वाढ दिसली. त्यापैकी बहुतेक लोक कोरोनाव्हायरसच्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय सेवेला विलंब करताना दिसलेच व ह्या वर घरगुती उपचार घेण्याचे प्रयत्न करून परिणामी योग्य उपचारानंपासून दूर राहिले.
ही गोष्ट लक्षात घेऊन डॉ अश्विन पोरवाल (संस्थापक-अध्यक्ष, हीलिंग हॅण्डस फॉउंडेशन ) व डॉ स्नेहल पोरवाल (संस्थापक-सचिव, हीलिंग हॅण्डस फॉउंडेशन )यांनी टाकवे बु,तालुका मावळ येथे हीलींग हँड्स फाउंडेशन व , शिवाजी असवले मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने, मुळव्याध, बद्धकोष्ठता, हर्निया, भगंदर, व्हेरीकोस व्हेन्स व इतर पोटाचे विकार यावर तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.
सदर शिबिरास ,हिलींग हँडस फाउंडेशन तर्फे मधुरा भाटे (संस्था समन्वयक) यांनी रुग्णांना तपासले व आहार कसा असावा याविषयी माहिती दिली , अनिता सैद (शिबीर व्यवस्थापक)यांनी शिबिराचे सर्व नियोजन केले, तेजश्री खलाटे यांनी समुपदेशन केले व औषधे दिले,आनंद मिसाळ,शकील शेख, यांचे शिबिरास मोलाचे सहकार्य लाभले.
मावळचे लोकप्रिय आमदार जनसेवक सुनील अण्णा शेळके वाढदिवसानिमित्त शिवाजी असवले,रामदास वाडेकर यानी या शिबिरासाठी सहकार्य केले.
शिबिरात १८० रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.औषध वाटप करण्यात आले. ह्या आजरांविषयी योग्य माहिती व मार्गदर्शन घरोघरी पोहोचवण्याचा हीलिंग हॅण्डस फॉउंडेशन चव्हाण प्रयत्न आहे.

error: Content is protected !!