
वडगाव मावळ:
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मावळ दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकारी, शहराध्यक्ष, सर्व सेल अध्यक्ष यांची बैठक सोमवार दि. १८ ला १०.३० वाजता शासकिय विश्रामगृह वडगाव मावळ येथे होणार आहे.आमदार सुनिल शेळके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष
बबनराव भेगडे,संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे,पुणे जि. नियोजन समितीचे सदस्य विठ्ठलराव शिंदे, पशुसंवर्धनचे सभापती बाबूराव वायकर,जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
- कोथुर्णेच्या पिडीतीला न्याय कधी?आमदार सुनिल शेळके विधी मंडळात कडाडले
- कान्हे रेल्वे गेट दोन दिवस बंद राहणार असल्यामुळे नागरिकांची प्रवासा दरम्यान होणार तारांबळ
- आढले बुद्रुक येथे ३६ फूट ध्वज स्तंभाचे अनावरण
- विद्युत वाहक तारेचा शॉक लागल्याने शिरगावात शेतकऱ्याचा मृत्यू
- पर्वती माणकु काळे यांचे निधन



