वडगाव मावळ:
उपमुख्यमंत्री अजित पवार मावळ तालुक्याच्या दौ-यावर येत आहे. यासाठी मावळ नगरी सजू लागली आहे. उपमुख्यमंत्री पवार यांच्या स्वागताचे बॅनर झळाळू लागले आहे. पवार यांच्या दौऱ्यात राष्ट्रवादी काॅग्रेस जोरदार शक्तिप्रदर्शन करेल असे दिसतेय.या दौ-यात पवार यांच्या हस्ते तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हेही या दौऱ्यात सहभागी असणार आहे.
बुधवार दि.२० ऑक्टोबर २०२१ दुपारी २ वाजता लोणावळा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या विकास कामाचे भूमिपूजन,दुपारी ३ वाजता कार्ला येथील रस्त्याचे
भूमिपूजन,दुपारी ३.३० वाजता आंदर,नाणे मावळ, कामशेत येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन,दुपारी ४.०० वाजता कान्हे येथील ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर भूमिपूजन, दुपारी ४.३० वाजता
वडगाव प्रशासकीय इमारत व विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. सायं ५.०० वाजता वडगाव मावळ पोलीस स्टेशन शेजारी जाहीर सभा होणार आहे. याच दिवशी मावळचे आमदार सुनिल शेळके यांचा वाढदिवस आहे. या मेळाव्यात आमदार शेळके यांचे अभिष्टचिंतन केले जाईल.
आमदार सुनिल शेळके राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आल्या नंतर कोरोनाचा काळ वगळता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पहिलाच मावळ दौरा आहे. या दौ-यात मावळातील राष्ट्रवादीचे शक्तिप्रदर्शन दिसणार आहे. या शिवाय राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करणा-यांचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते स्वागत करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!