टाकवे बुद्रुक:
टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने सांडपाणी निर्मूलन व बंदिस्त गटार योजनेच्या कामाला प्राधान्य दिले जात आहे.अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या कामाला दणक्यात सुरूवात करण्यात आली आहे.
टाकवे वडेश्वर मुख्य रस्ता, टाकवे येथील बुद्ध विहार त्याठिकाणी अनिल बबन जाधव यांच्या घरासमोरील रस्त्यावरती गेले काही दिवसांपासून गटारीचे पाणी येऊन खूप मोठी समस्या निर्माण झाली होती.
या शिवाय शितळादेवी मंदिर परिसरात सांडपाणी रस्त्यावर वाहत होते. या सर्व कामांना प्राधान्य देण्यात आले असून ही कामे तातडीने पूर्ण करण्याकडे ग्रामपंचायतीने कंबर कसली आहे.
ही समस्या सोडवण्यासाठी आज ग्रामपंचायतीच्या वतीने त्या ठिकाणी जेसीबी लावून गटार पूर्णपणे साफ करून सुरळीत करण्यात आले यामुळे, त्या ठिकाणच्या भागात गटाराचे पाणी रस्त्यावरती पाणी येत असल्यामुळे गाडी चालवताना खूप मोठी कसरत करावी लागत होती. रस्त्यावरती पाणी असल्यामुळे गाडी चालवताना नागरिकांच्या अंगावरती पाणी उडाल्यामुळे वाहन चालक व नागरिकांमध्ये वादावादी सुद्धा होत होती.
गटार खोदाईचे काम मार्गी लागल्यावर ग्रामपंचायतीने येथे मो-या टाकायच्या कामाला सुरुवात केली आहे. यावेळी सरपंच भूषण असवले,माजी उपसरपंच सतू दगडे,ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ असवले,राजू शिंदे उपस्थित होते.
या सर्व गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामपंचायत मधील सरपंच उपसरपंच यांच्या माध्यमातून येथील समस्या सुटली आहे. त्यामुळे संबंधित नागरिकांनी ग्रुप ग्रामपंचायत सरपंच भूषण असवले यांचे कौतुक केले आहे.
त्याची दखल घेत आज ग्रामपंचायतीमार्फत सरपंच व उपसरपंच यांच्या पुढाकाराने या ठिकाणी जेसीबी मशिनच्या साह्याने गटाराची दुरुस्ती करण्यात आली आहे.
येणाऱ्या दोन दिवसांमध्ये या ठिकाणी मोऱ्या टाकून बंदिस्त गटारे करण्यात येणार आहे अशी माहिती सरपंच भूषण असवले यांनी दिली आहे.
सरपंच भूषण असवले म्हणाले,” अनेक वर्षांपासून ही कामे रेंगाळलेली होती, या कामाला प्राधान्य कम देण्यात आला आहे. याठिकाणी अनेक महिन्यांपासून ही खूप मोठी समस्या होती, तसेच हा मुख्य रस्ता असल्यामुळे पर्यटक कामगार वर्ग व आंदर मावळ मधील 40 ते 42 गावच्या नागरिकांची वाहतुकीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे, या पाण्यामुळे गाडी चालवताना गाडी चालक यांना समस्या खूप होत होत्या,तसेच येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते.

error: Content is protected !!