घोडेगाव:
तुळजापूरची तुळजाभवानी उभ्या महाराष्ट्राचे दैवत. महाराष्ट्तील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी हे एक. तुळजापूर उस्मानाबाद जिल्ह्यातील बालाघाट डोंगराच्या पठारावर. तुळजा हे त्वरजा या शब्दाचा अपभ्रंश आहे, असे सांगितले जाते.
कृतयुगाच्या वेळी ‘कर्दम’ ऋषींची पत्‍नी ‘अनुभूती’ हिच्याबद्दल ‘कुंकुर’ नावाच्या दैत्याला अभिलाषा उत्पन्न झाली. तिच्या पातिव्रत्याच्या भंग करण्याचा त्याने प्रयत्‍न करताच देवी पार्वती ही धावून आली. तिने दैत्याचा नाश केला. त्वरित धावून येणारी म्हणून ती त्वरिता किंवा मराठीत तुळजा, अशी आख्यायिका सांगितली जाते.
छत्रपती शिवाजी महाराजांनीही तिला कुलस्वामिनी मानून, तुळजाभवानी मातेची  प्रतापगडावरही प्रतिष्ठापना केली.
भवानी मातेचा जागर महाराष्ट्रभर केला जातो .स्फूर्ती आणि शक्तीचे प्रतिक असलेल्या आई तुळजा भवानी तील ‘जय भवानी ‘हा शब्द सळसळत्या रक्ताची प्रेरणा आहे. कुलस्वामिनी भवानी मातेची महाराष्ट्रभर मंदीरे आहे. असे मातेचे मंदिर स्वखर्चातुन घोडेगाव येथे मारूती नरहरी काळे आणि मिराबाई मारूती काळे या दांपत्याने उभारले.नोकरी आणि शेती या कमाईतून काळे दांपत्याने १९८७च्या सुमारास हे बांधलेले आईचे मंदीर घोडेगाव पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
येथे दर्शनास मावळ तालुक्यातील अनेक भक्तजन मोठ्या श्रद्धेने दरवर्षी जात असतात. जिर्णोद्धार नंतर झालेल्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा व मंदीर कलशरोहण सोहळ्याची ती भव्यता ज्यांनी अनुभवली ती आजही तशीच्या तशीच आहे .एक दैदीप्यमान सोहळ्यात मावळवासीय सहभागी झाले होते नवरात्रोत्सवात नऊ दिवस येथे विविध धार्मिक कार्यक्रमाची मोठी रेलचेल असते.
तशीच बाराही महिने हा परिसर भक्तीच्या मळयाने फुलून गेलेला असतो. भाविकांच्या श्रद्धेचे हे ठिकाण स्फूर्ती,प्रेरणेचे मंदीर आहे. काळे दांपत्याची पुढची पिढीही या सेवेत रुजू होऊन आपली सेवा बजावत आहे.

error: Content is protected !!