पवनानगर :
पवना बंदिस्त जलवाहिनीला विरोध करण्यासाठी पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर झालेल्या अंदोलनात पोलीसांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झालेल्या तीन शेतकर्‍यांच्या कुटुंबियांची विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी घरी जाऊन भेट घेतली.
एकिकडे लखीमपूर येथील शेतक-यांना चिरडले म्हणून महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदचा नारा दिला.त्यातच दिवशी विरोधी पक्षनेते दरेकर यांनी पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी झालेल्या अंदोलनात मृत्यू पावलेल्या शेतक-यांच्या घरी भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना दरेकर यांनी
महाविकास आघाडी सरकारचा चांगलाचं समाचार घेतला.
दरेकर म्हणाले ” महाराष्ट्रमध्ये लखीमपुरच्या झालेल्या घटनेच्या संदर्भात महाराष्ट्र बंद करण्याचं काम महाविकास आघाडी सरकारने केलं आहे. सरकार पुरस्कृत बंद असा आजचा हा महाराष्ट्र बंद होता.बंद किती यशस्वी झाला. किती प्रकारे दबाव तंत्राचा वापर करुन कुठे रिक्षा वाल्याला मारहाण करुन कुठे रिक्षाची चावी काढुन घेणे. तर चंद्रपुरला दम दाटी करणे अशा संपुर्ण घटना महाराष्ट्रत घटना झाल्या.
परंतु मी या मावळच्या तीन गावात एवढ्यासाठी आलो आहे.कि मावळ मध्ये ९ ऑगस्ट २०११ रोजी या ठिकाणी शेतकर्‍यांनवर गोळीबार झाला त्याच्या स्मृती हे सरकार विसरले. लखीमपुर येथील घटनेला जालियनवाला बाग हत्याकांड बोलायचं.
मग मावळात झालेला गोळीबार आठवलं नाही का?मात्र लखीमपूर झालेली घटना ती हत्याकांड होऊ शकली.मग मावळात झालेल्या गोळीबाराला कशाची उपमा द्यावी.
आज महाराष्ट्रात शेतकरी उद्धवस्त झालायं.महाराष्ट्र वर निसर्गवादळाचं संकट आले,तोक्ते चक्रीवादळांच संकट आलं.पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी पुर्ण पणे उद्धवस्त झाला.काहीचं मदत दिली नाही या सरकारने. काही दिवसापुर्वी मराठवाडा,विदर्भामध्ये अतिवृष्टीने शेतकरी पूर्णपणे उद्धवस्त झाला आहे.पुढील चार ते पाच वर्ष काहीचं पिके घेता येणार नाही.
शेतकऱ्यांना एक दमडीची मदत सरकारने केली नाही.पीक विमा मिळाला नाही.देवेंद्र जीच्या काळात पिक विम्याचे पैसे भरले नव्हते. तरी ५० टक्के पिक विमा दिला गेला.आज शेतकर्‍यांच्या पंपाच्या लाईट कापल्यात,घराच्या लाईट कापल्यात.आता शेत निट करायला एकरी काही हजाराचा खर्च आहे.त्याबद्दल काही नाही.
महाराष्ट्र मध्ये हजारोंच्या संख्येने शेतकरी मरतायत त्याच्याबद्दल कॅबिनेट मध्ये श्रद्धांजली वाहिली नाही.पंरतु लखीमपुरची घटना आमच्या हितल्या कॅबिनेट मध्ये आम्ही श्रद्धांजली वाहतो.आणी त्याचं राजकारण करतो.श्रद्धांजली वाहयला हि हरकत नाही.लखीमपुरची घटना वाईटचं आहे.आम्ही त्याचा निषेधचं करतो.
गृहराज्यमंत्र्याच्या मुलाल अटक ही करण्यात आली आहे.त्याच्यावर कारवाई ही करण्यात येईल असेही प्रविण दरेकर म्हणाले.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे,तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, पवना बंद जलवाहिनी कृती समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर दळवी, एकनाथ टिळे, माजी संचालक पांडुरंग ठाकर, बाळासाहेब घोटकुले माजी उपसभापती शांताराम कदम,भाजपा गण अध्यक्ष नारायण बोडके, बबन कालेकर, अंकुश पडवळ, संदिप भूतडा, चेअरमन मधुकर काळे,किसन घरदाळे,संघटनमंत्री गणेश ठाकर
सरपंच संजय केदारी,संतोष दळवी, सचिन मोहिते उपस्थित होते.

error: Content is protected !!