शेलारवाडी:
निगडी येथील अनुजा चैतन्य जोशी कुलकर्णी यांनी नारळाच्या कवटीवर हुबेहुब अमरदेवी माता साकारली आहे.लहानपणापासूनच चित्रकलेची आवड असणाऱ्या अनुजा यांनी अथक मेहनत घेऊन आपली ही सुंदर कला जोपासली आहे.
यापूर्वी त्यांनी बेलाच्या पानावर महादेवाचे,आंब्याच्या पानावर गुढीपाडव्याचे,केळीच्या पानावर प्रभू रामचंद्रांचे,रुईच्या पानावर हनुमानाचे चित्र काढून अनेकांची वाहवा मिळवलेली आहे.गणेशोत्सवाच्या काळातही त्यांनी छोट्याशा सुपारीवर गणपतीचे पेंटिग साकारले होते.कलेप्रती असणारी आवड,प्रचंड मेहनत व कुटुंबियांची साथ यातून हे साध्य झाले आहे असे अनुजा यांनी सांगितले.
देहुरोड व मावळ परिसरात अमरदेवी मातेचे भक्तगण अधिक असल्याने देवी थेट नारळाच्या कवटीवर रेखाटण्याचा संकल्प त्यांनी केला व शासकीय आदेशाप्रमाणे प्रत्यक्ष दर्शन सुरु झाल्यानंतर मंदिरात येऊन तो पुर्णत्वास नेला.
नारळाच्या कवटीवर साकारलेले अमरदेवी मातेचे चित्र पाहून अनेक भक्तांनी आनंद व्यक्त केला.नारळाच्या कवटीवर साकारलेल्या अमरदेवी मातेला पाहून सोशल मिडीयावरही कौतूकाचा वर्षाव झाला.
अनुजा यांनी ही कला सतत जोपासावी व भविष्यात अधिकाधिक यश संपादन करावे अशी अपेक्षा शेलारवाडी येथील अमरदेवी मातेचे भक्त सतिश भेगडे व उमेश माळी यांनी केली.
देवीची मुर्ती हुबेहूब साकारणे ही कला अभिजात असून ती दैवी देणगी आहे अशी प्रतिक्रिया बाळासाहेब शेलार,विशाल जोशी व मृणाल माळी यांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!