पवनानगर:
राज्यात रक्ताचा रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णांना रक्ताची गरज भासत असल्याने नातेवाईकांची धावपळ सुरु आहे, तर काहींना वेळेवर रक्त मिळत नसल्यामुळे जीव गमवावा लागत असल्याच्या काही घटना आपण पाहतो.
या परिस्थितुन सावरण्यासाठी व सामाजिक बांधिलकी म्हणून येलघोल येथील शिवजगदंब प्रतिष्ठाणने नवरात्र महोत्सवनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये २५ रक्तपिशव्या संकलित केल्याची माहिती प्रतिष्ठाण चे खजिनदार प्रदीप घारे यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तपेढ्याना रक्त संकलन करणे आव्हानात्मक झाले होते. कोरोनाच्या भीतीमुळे अनेक नागरिक रक्तदानासाठी येत नसताना देखील प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्यांनी समाजात वेगळा आदर्श निर्माण केला. पिंपरी चिंचवड ब्लड बँक यांनी येऊन रक्त संकलन केले . रक्तदानामध्ये तरुणांबरोबरच जेष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला.
यावेळी मावळ तालुक्याच्या माजी सभापती निकिता घोटकुले, येलघोलचे सरपंच जयवंत घारे, शांताराम भरणे, नामदेव भिलारे, चंद्रशेखर कोंगे उपस्थित होते.

error: Content is protected !!