तळेगाव दाभाडे:
माय भगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरायला आमदार सुनिल शेळके यांनी पहिले पाऊल टाकले.आता दुसरे पाऊल गावागावातील पाऊलवाटेवर पडलेले खड्डे काढून खड्डेमुक्त रस्त्यासाठी पडेल असा विश्वास कुलस्वामिनी महिला मंचाच्या अध्यक्षा सारीका शेळके यांनी दिला.
वराळे येथे आमदार सुनिल शेळके यांच्या आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत वराळे गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण समारंभ कुलस्वामिनी महिला मंचच्या अध्यक्षा सारीका शेळके यांच्या व नगरसेविका संगिता शेळके यांच्या हस्ते झाले यावेळी शेळके यांनी विश्वास दिला.
ग्रामपंचायत सदस्या सारीका रामदास मांडेकर, सीमा विकास मराठे, अस्मिता निलेश मराठे, मनीषा राम मराठे, लिलाबाई वाजे, मा.ग्रामपंचायत सदस्य कल्पेश मराठे, राम मराठे पाटील, उद्योजक शरद भोंगाडे, पांडुरंग कोयते, मेजर चंद्रकांत सोनावणे, ॲड.देविदास मराठे, गौरव लोंढे, समीर बनसोडे, सोमनाथ कोयते, दिपक कारेकर,अमोल मराठे उपस्थितीत होते.
आंबी रोड ते भोंगडे पार्क गणेश मंदिर रस्ता डांबरीकरण करणे, पूजा ग्रीन हाऊस ते जय महाराष्ट्र सोसायटी रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, आंबी रोड ते वर्धमान सोसायटी बंदिस्त गटार करणे, आंबी रोड ते वर्धमान सोसायटी रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, गणेश कॉलनी रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, गणेश नवगिरे घर तेजस वडघुले घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरणाचा या कामांचा यामध्ये समावेश आहे.कल्पेश मराठे यांनी प्रास्ताविक केले. विकास सावळे यांनी सुत्रसंचालन केले. दिपाली वानखेडे यांनी आभार मानले.

error: Content is protected !!