टाकवे बुद्रुक:
इंगळूण पारीठेवाडी गावचे, ग्रामदैवत “आई महादेवी माता” डोंगरांच्या मध्यावर असलेले मंदीर.पारीठेवाडीतून मंदिरापर्यंत पायी जगण्यासाठी डोंगरांची चढण चढून वर पोहचावे लागते. पंचक्रोशीतील भाविक मोठ्या भक्तीने येथे येऊन नवरात्रोत्सवात देवीचे दर्शन घेऊन यश मागत आहेत.
डोंगराच्या कुशीत वसलेले देवीची स्वयंभू मूर्ती भाविकांच्या अस्मितेचा भाग आहे. नवरात्रोत्सवात विविध धार्मिक उपक्रमाने हा परिसर भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेला आहे. गावालगतच्या पायथ्याशी महादेवी मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला आहे .निसर्ग सौंदर्याने वेढलेल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगेत एका कोंदणात महादेवी विसावलेली आहे.
इंगळूण पारीठेवाडी सह पंचक्रोशीत देवीचे भक्तजण भक्तीभावाने देवीला शरण जात आहे .हा परिसर भक्तिमय वातावरणात प्रसन्नतेच उत्तम उदाहरण आहे. पर्यटक निसर्गप्रेमी व इतिहास प्रेमींना खुणावत आहे. भौगोलिक दृष्ट्या अत्यंत सुंदरता लाभलेल्या परिसरात पर्यटनवाढीला मोठा वाव आहे.
रोजगाराच्या अनेक संध्या येथे उपलब्ध होतील अशी परिस्थिती आहे. लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि कृषी पर्यटनाची संबंधित काम करणाऱ्या समूहाने येथे इच्छाशक्ती दाखवून परिसराचा विकास करण्यासाठी हातभार लावावा अशी अपेक्षा नागरिक करीत आहे. मागील महिन्यात कृषी मंत्री दादा भुसे यांनी पुणे जिल्ह्यात जिल्ह्यातील कृषी पर्यटक यांच्यासमवेत पारीठेवाडीत बैठक घेऊन कृषी पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुतोवाच केले आहे.
हाच धागा पकडून कृषी पर्यटन, हेरिटेज वॉक, ग्रामीण कृषी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या व्यवसायाला चालना देण्यासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करणे आवश्यक आहे.

error: Content is protected !!