तळेगाव दाभाडे:
वाढत्या वयात आरोग्याकडे सर्वसामान्य माणसांचं दुर्लक्ष होत चाललंय आरोग्याची काळजी घेण्यासाठी नियमितपणे व्यायामाची गरज असल्याचा सल्ला महावीर हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डाॅ. विकेश मुथा यांनी दिला.
वेगवेगळ्या टेन्शनमध्ये असलेला माणूस अनेक आजारांना सामोरा जाऊ लागला आहे.हृदयासी संबंधित आजार अती टेन्शनमुळे वाढू लागला आहे. यावर चालणे, फिरणे ,धावणे,प्राणायाम हा प्रभावी उपाय असल्याने नागरिकांनी आरोग्याच्या बाबतीत कोणतीच तडजोड करू नये असा सल्लाही डाॅ.यांनी दिला. येथील
येथील स्वप्ननगरी येथे नवरात्र उत्सवानिमित्त महावीर हॉस्पिटल कामशेत व स्वप्ननगरी सार्वजनिक मित्र मंडळाच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलं होते.
यावेळी डॉ. मुथा बोलत होते , या आरोग्य तपासणी शिबिरात सुमारे दीडशे नागरिकांनी तपासणी करण्यात आली.फिजिओथेरपी ,हिमोग्लोबीन, रक्तदाब या तपासण्या मोफत करण्यात आल्या .तसेच अंगदुखी, डोकेदुखी ,थंडी ,ताप यावर औषध उपचार करण्यात आले .महावीर हॉस्पिटल चे सुदर्शन सावंत , डॉ. देविलाल बांबू, रूपाली साळुंके ,ममता देवडा ,विद्या मालपोटे ,अतुल बांगर ,गणेश भोकरे यांनी शिबिरासाठी परिश्रम घेतले. स्वप्ननगरी मित्र मंडळाचे अध्यक्ष
लहू ढेरंगे ,अभिजीत कुंडल ,सौरभ सावंत, कल्याण भाग्यवंत,देवराम सावंत, अभिजीत शिंदे, स्वप्निल रुपनवर, शुभम सावकार ,चेतन पवार, विराज सावंत, संजय देशमुख, दत्ताराम तिखे,राहुल वचकल ,विशाल गायकवाड, शशिकांत धनगे ,पंकज पवार ,महावीर पाटील उपस्थित होते.
महावीर हॉस्पिटलच्या वतीने गरजूंना महावीर हेल्थ कार्ड चे वाटप केले. लहू ढेरंगे यांनी प्रास्ताविक केले. आदित्य वाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. सौरभ सावंत यांनी आभार मानले.

error: Content is protected !!