वडगाव मावळ :
सिलेंडर गॅस वर भाजी शिजत होती आणि अचानक पाहिलं तर घ्यास चा इंडिकेटर वर अर्धा गॅस दिसत होता. आता गॅस संपला असं समजून आम्ही तर हतबल झालो. एवढ्या रात्री गॅस आणायचा कुठून आणि गॅस नाहीतर स्वयंपाक करायचा कसा हा प्रश्न पडला. पण आठ दिवसापूर्वी लावलेला गॅस कसा संपेल म्हणून तो हलून पाहिला.
तर सिलेंडर च्या टाकीत गॅस ऐवजी पाणीच भरले असं वाटलं असं एकदा नाही दोनदा घडलंय.गॅस कंपन्या गिऱ्हाइकांची फसवणूक करीत आहे .यांना वेळीच रोखले पाहिजे. नाहीतर महागाईत किमती वाढल्या आहेत. सिलेंडर कंपनी गॅस कंपन्या भरमसाठ पैसे आकरून गॅस ऐवजी पाणी भरून देऊ लागल्या तर सर्वसामान्य माणसांनी काय करायचं ,
असा प्रश्न वडगाव मावळ येथील दिनेश पंढरीनाथ बो-हाडे यांनी केलाय बो-हाडे म्हणाले ,” मी
दिनेश पंढरीनाथ बोऱ्हाडे Consumer no- ६३४८७० हा माझा नंबर आहे. गॅस घेतलेला ती तारीख २/१०/२०२१ आणि गॅस लावलेला तारीख
९/१०/२०२१ ती ही तारीख.
९/१०/२०२१ ह्या तारखेला गॅस लावत असताना गॅस regulator च्या इंडिकेटर वर गॅस अर्धाच असल्याचे दाखवले, तसेच गॅस हलवून पाहिल्यावर त्यातून पाण्या सारखा आवाज आला. असे आमच्यासोबत दोनदा झाले आहे. आशा वेळी आम्ही सर्वसामान्य माणसांनी काय करायचं.
चुकीचं काम करणाऱ्या गॅस सिलेंडर एजन्सी ना संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य सूचना देऊन कारवाई करावी चे दोनदा माझ्या बाबतीत झालं ते इतरांच्या बाबतीत होऊ नये म्हणून मी माझी कैफियत मांडली आहे नागरिक बंधू-भगिनींनो वेळीच सावध व्हा अन्यथा रात्री आपला घ्या संपला तर मुलाबाळांना उपाशीच झोपावे लागेल.

error: Content is protected !!