तळेगाव स्टेशन:
नवरात्रोत्सवानिमित्त महावीर हाॅस्पिटल कामशेत व स्वप्ननगरी सार्वजनिक मित्र मंडळ यांच्या पुढाकाराने स्वप्ननगरी तळेगाव स्टेशन येथे मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महावीर हाॅस्पिटलचे सर्वेसर्वा डाॅ.विकेश मुथा व स्वप्ननगरी सार्वजनिक मित्र मंडळाचे अध्यक्ष लहू पाटीलबुवा ढेरंगे यांनी केले आहे.
रविवार दि.१० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ते दुपारी १ वाजेपर्यत आरोग्य तपासणी केली जाणार आहे.महावीर हाॅस्पिटलचे डाॅ.विकेश मुथा,डाॅ.प्रविण जाधव,डाॅ.देवीलाल भांबू तपासणी करून मार्गदर्शन करणार आहे.या शिबिरात मोफत ईसीजी काढून देण्यात येणार असून फिजिओथेरपी,हिम्मोग्लोबीनची तपासणी केली जाईल. या शिवाय थंडी,ताप,अंगदु:खी,डोकेदु:खी याही तपासणी केल्या जाणार आहेत.
महावीर हाॅस्पिटल तर्फे ‘महावीर हेल्थ कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. स्वप्ननगरी तील रहिवाशांनी या शिबीराचा लाभ घ्यावा. येथील क्लब हाऊस मध्ये शिबीर होणार आहे. प्रथम येणा-यास प्रथम संधी दिली जाणार आहे.अधिक माहितीसाठी 9822403422, +91 98691 23017, +91 88888 68395 या क्रमांकावर संपर्क साधावा.

error: Content is protected !!