वडगाव मावळ:
आगामी जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मावळ
तालुक्यामध्ये अनुसूचित जाती करिता आरक्षीत जागा
करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी तथा निवडणुक अधिकारी पुणे जिल्हा यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मावळ तालुका युवक अध्यक्ष चंद्रकांत तुकाराम ओव्हाळ व पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अंकुश उमाजी चव्हाण यांनी निवडणूक अधिकारी यांना या आशयाचे निवेदन देऊन ही मागणी केली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,” जिल्हा परिषद सन१९६२ सालामध्ये स्थापना झालेली असुन, गेले ५९ वर्षामध्ये मावळ तालुक्यामध्ये
अनुसूचित जातीकरीता आरक्षण करण्यात आलेले नाही. जिल्हा परिषदेच्या एकुण ७५ सदस्य असुन पैकी मावळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेकरीता ५ सदस्य पदाकरीता
जागा आहेत.
असे असताना अदयाप पावेतो मावळ तालुक्यामध्ये अनुसूचित जाती करिता ५९ वर्षामध्ये एकदाही जिल्हा परिषदेकरीता सदस्य पदाकरीता आरक्षण करण्यात
आलेले नाही. वास्तविक पाहता एस.सी. व एस.टी. यांच्या लोक संख्येच्या नुसार आरक्षण करते वेळी फिरते रोडीशन प्रमाणे प्रत्येक पंचवार्षिक लोक संख्येच्या
उतारत्या क्रमाने आरक्षण करणे गरजेचे आहे.
आम्ही आमचे पक्षाचे वतीने आपणास सदर पत्रान्वये विनंती करीत आहोत की, मावळ तालुक्यामधील जनगणनेनुसार अनुसूचित जातीकरीता आगमी जिल्हा
परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मावळ तालुक्यामध्ये ५ जिल्हा परिषद सदस्यांपैकी ज्या गटामध्ये अनुसुचित लोक संख्या सर्वाधिक आहे त्या ठिकाणी अनुसूचित
जातीसाठी आरक्षण करण्यात यावे असे या निवेदनात नमूद करून निवेदन देण्यात आले आहे.

error: Content is protected !!