मावळमित्र न्यूज विशेष:
चौराईदेवी माता सोमाटणे गावची ग्रामदैवत. भाविकांच्या श्रद्धेचे ठिकाण. निसर्गाच्या कोंदणात वसलेली चौराईदेवी.भक्तांच्या नवसाला पावणारी जागृत देवस्थान अशीही चौराईदेवी आईची ख्याती.
सह्याद्री पर्वताच्या रांगेमध्ये सोमाटणेच्या हद्दीत चौराईदेवीचे मंदिर. निसर्गाच्या वनराईत नटलेले हे मंदीर नवरात्रोत्सव भाविकांच्या गर्दीने अधिकच फुलून जाते. ग्रामदैवत चौराई देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
या मंदिराच्या पूर्वेला घोरावडेश्वर मंदिर व लेणी, बिर्ला गणपतीचे भव्य व प्रशस्त रूप तर शिरगाव येथील श्री साईबाबाचे मंदिर ही प्रेक्षणीय व धार्मिक स्थळे सर्वपरिचित आहेत.
सोमाटणे गावाचे ग्रामदैवत म्हणून चौराई देवीची ओळख आहे. या मातेचे देवस्थान चौराई डोंगरावरती खडकाच्या कपारीमध्ये वसलेले आहे..या मंदिराचा गेल्या दोन वर्षांपासून सोमटणे गावचे ग्रामस्थ, सामाजिक
संस्था तसेच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन भव्य मंडप व मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. त्यामुळे एक प्रेक्षणीय मंदिराची बांधणी
झाली.
या मंदिरात देवीच्या दर्शनासाठी जाण्यास सोपा रस्तादेखील निर्माण केला आहे. यामुळे या चौराई मातेच्या दर्शनासाठी भक्त व पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. या चौराई मातेच्या मंदिर परिसरात डोंगरावरती गेल्यानंतर संपूर्ण तळेगाव, सोमाटणे गाव नजरेत भरते. तसेच, या ठिकाणावरून बिर्ला गणपतीचे व घोरावडेश्वर लेणीचे दर्शन होते. याचबरोबर पवना नदी तसेच
इंद्रायणी नदी देखील नागमोडी वळण घेऊन वाहताना दिसते.
या ठिकाणी असलेल्या अनेक झाड्यांमुळे जंगलामध्ये प्रवेश केल्याचा भास होतो. त्याचबरोबर या झाडांमध्ये असलेले मोर व अन्य पक्षी व प्राण्यांचेदेखील दर्शन नकळत होते. पूर्वी चौराई मातेचे दर्शन घ्यायचे म्हटले
म्हणजे डोंगरावरची चढण अत्यंत अवघड होती. परंतु, सध्या चांगल्या.प्रकारचा रस्ता व मंदिराचे सुशोभीकरण केल्याने या देवीच्या मंदिरात गेल्यानंतर पुन्हा कुटुंबा समवेत दर्शनाला येणा-या भाविकांची मोठी संख्या आहे.(शब्दांकन-उमेश माळी शेलारवाडी)

error: Content is protected !!